शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

गुडन्यूज.... कोरोनाचे ८२ टक्के रुग्ण झाले बरे, ५९ लाखांवर बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2020 02:31 IST

कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांच्या संख्येत सतत वाढ , बळींचा आकडा ९३,३७९

नवी दिल्ली : देशामध्ये शनिवारी कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या अधिक झाली आहे. कोरोनाचे ८५,३६२ नवे रुग्ण आढळून आले, तसेच ९३,४२० लोक कोरोनातून बरे झाले असून, अशा व्यक्तींची एकूण संख्या ४८ लाखांपेक्षा अधिक झाली आहे.

रुग्णांची एकूण संख्या ५९,०३,९३२ झाली आहे. या आजारामुळे आणखी १,०८९ जण मरण पावले असून, त्यामुळे बळींची एकूण संख्या ९३,३७९ झाली आहे. बरे झालेल्यांची एकूण संख्या ४८,४९,५८४ झाली असून, हे प्रमाण ८२.१४ टक्के आहे. रुग्णांचा मृत्यूदर १.५८ टक्के आहे. सध्या ९,६०,९६९ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून, हे प्रमाण १६.२८ टक्के आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार २५ सप्टेंबर रोजी १३,४१,५३५ चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे चाचण्यांची संख्या ७,०२,६९,९७५ इतकी झाली आहे.20 लाखांवर कोरोना बळींची संख्या जाणार?जागतिक स्तरावर कोरोना प्रतिबंधक लस सर्वांना टोचली जाण्याच्या आधीच या आजाराच्या बळींची संख्या सध्यापेक्षा दुप्पट म्हणजे २० लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.10 लाखांवर कोरोना बळींचा एकूण आकडातेलंगणात बार, क्लब पुन्हा सुरूतेलंगणातील पर्यटन स्थळ परिसरातील बंद ठेवण्यात आलेले बार, क्लब तातडीने पुन्हा सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. बार, क्लबच्या परवान्याचे नूतनीकरण करण्याची अंतिम मुदत १ आॅक्टोबर असून, त्याला आता फक्त पाच दिवस उरले आहेत.तेलंगणात १४०० बार आहेत. केवळ परवाना शुल्काची मोठी रक्कम गोळा करता यावी याच एकमेव उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असावा अशी टीका काही बारमालकांनी केली आहे. बार, क्लबचे परवाना शुल्क ४१ लाख असून, अर्ज दाखल करण्याचे शुल्क २ लाख रुपये आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू