शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

13 वर्षाच्या मुलीवर आठ शिक्षकांनी केला सामूहिक बलात्कार

By admin | Updated: March 26, 2017 18:53 IST

राज्यस्थानातील बिकानेरमध्ये आठ शिक्षकांनी 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामुहीक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 26 - राज्यस्थानातील बिकानेरमध्ये आठ शिक्षकांनी 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामुहीक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दीड वर्षांपासून तिच्यावर अत्याचार करण्यात येत असल्याचीही माहिती समोर आली आहे. पडितेच्या आई-वडिलांनी त्या शिक्षकांविरोधात काल पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या वर गंभीर आरोप केले आहेत. नराधम शिक्षकांनी मुलीला जबरदस्तीने गर्भनिरोधक गोळ्या खायला दिल्या असून या गोळ्यांच्या अतिसेवनामुळे मुलीला कर्करोग झाल्याचा आरोप पीडितेच्या पालकांनी केला आहे. सध्या आठही शिक्षक पसार असून त्यांचा शोध सुरु आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे. अतिरिक्त तासाच्या नावाखाली शाळा सुटल्यावर नराधम शिक्षक पीडितेला शाळेत थांबवून ठेवायचे. पिडितेला एका खोलीत नेले जायचे आणि तिथे तिच्यावर अत्याचार केले जायचे. नराधमांनी पीडितेचा अश्लील व्हिडीओदेखील तयार केला होता. या व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल केले जायचे. पीडितेने भीती पोटी पालकांना हा प्रकार सांगितला नाही. दीड वर्षांपासून तिच्यावर अत्याचार सुरुच होते. दुर्दैवी बाब म्हणजे पीडितेच्या पालकांना हा प्रकार समजला होता. मात्र पोलीस तक्रार केल्यास समाजात नाचक्की होईल या भीतीपोटी त्यांनी पोलिसांकडे जाणे टाळले. सध्या पीडितेवर बीकानेरमधील कर्करोग रुग्णालयात उपचार सुरु आहेत.