जिल्ातील ८ न्यायाधीशांच्या बदल्या न्यायालय : दुसर्या जिल्ातून ९ न्यायाधीश बदलून येणार
By admin | Updated: April 28, 2016 00:32 IST
जळगाव : जिल्ातील ८ न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या आहेत. या बदली प्रक्रियेत बाहेरच्या जिल्ातून ९ न्यायाधीश जळगाव जिल्ात बदलून येत आहेत. बदली प्रक्रियेचे आदेश नुकतेच जिल्हा न्यायालयास प्राप्त झाले आहेत.
जिल्ातील ८ न्यायाधीशांच्या बदल्या न्यायालय : दुसर्या जिल्ातून ९ न्यायाधीश बदलून येणार
जळगाव : जिल्ातील ८ न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या आहेत. या बदली प्रक्रियेत बाहेरच्या जिल्ातून ९ न्यायाधीश जळगाव जिल्ात बदलून येत आहेत. बदली प्रक्रियेचे आदेश नुकतेच जिल्हा न्यायालयास प्राप्त झाले आहेत.दरवर्षी न्यायालयाला उन्हाळी सुट्या लागण्यापूर्वी न्यायाधीशांची बदली प्रक्रिया शासनास्तरावरून राबवण्यात येते. साधारणपणे एप्रिल महिन्याच्या अंतिम आठवड्यात या बदली प्रक्रियेस वेग येतो.जिल्ातून बदली झालेले न्यायाधीश (कंसात नियुक्तीचे ठिकाण)डी.पी. खंडेवाल- चाळीसगाव (जुन्नर, जि.पुणे), पी.ए. पत्की- चाळीसगाव (अमरावती), ए.एम. मानकर- जळगाव (लोणार, जि.बुलढाणा), ए.डी. बोस- जळगाव (पुणे), आर.डी. गवई- अमळनेर (कराड, जि.सातारा), ए.ओ. जैन- रावेर (नागपूर), एम.जे. मोहोळ- भडगाव (अकोट, जि.अकोला), ए.एस. देशमुख- धरणगाव (आमगाव, जि.गोंदिया).जिल्ात बदलून येणारे न्यायाधीश (कंसात नियुक्तीचे ठिकाण)डी.जी. मालवीय- अकोट, जि.अकोला (रावेर), ए.पी. गिरडकर- मूर्तीजापूर, जि.अकोला (चाळीसगाव), ए.एम. कुलकर्णी- गंगापूर, जि.औरंगाबाद (अमळनेर), पी.एस. जोंधळे- मंठा, जि.जालना (भडगाव), एस.एन. भावसार- नागपूर (धरणगाव), जी.डी. लांडबळे- औरंगाबाद (चोपडा, जि.जळगाव), बी.डी. गोरे- वाशिम (जळगाव), व्ही.पी. धुर्वे- नागपूर (यावल, जि.जळगाव), ए.एम. गोंडणे- नागपूर (पाचोरा, जि.जळगाव).