शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

८ चित्त्यांचा १३९ बिबटे, १०० अस्वलांशी शिकारीसाठी संघर्ष होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 06:14 IST

कुनो अभयारण्यातील जैवसाखळीत होणार मोठे बदल

नवी दिल्ली : भारतात दाखल होणाऱ्या आठ चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात शनिवारी, १७ सप्टेंबर रोजी सोडण्यात येणार आहे. तिथे या चित्त्यांना १३९ बिबटे, १०० अस्वले यांच्यासोबत सहजीवन जगावे लागणार आहे. चित्ते हे नवे प्राणी या राष्ट्रीय उद्यानात आल्याने बाकीच्या प्राण्यांसाठीही तेथील जैवसाखळीतला मोठा बदल असेल. त्यामुळे या प्राण्यांमध्ये शिकारीवरूनही काही प्रमाणात संघर्ष होण्याची शक्यता आहे. 

चित्ते हे बिबट्यांप्रमाणेच मार्जारकुळातील प्राणी आहेत. मात्र, चित्ते बिबट्यांपेक्षा अधिक चपळ व शक्तिशाली असतात. जंगलामध्ये शक्तिशाली प्राण्यांचेच वर्चस्व प्रस्थापित होते. त्यामुळे चित्ते आल्यानंतर तेथील बिबट्यांचे अस्तित्व धोक्यात येणार नाही ना अशी चिंता काही वन्यजीव तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. बिबटे व चित्ते यांची शिकार करण्याचा पद्धत वेगळी आहे. बिबट्या आपली शिकार झाडावर घेऊन जातो. तसे चित्त्याला करता येत नाही, पण शिकार मिळविताना कदाचित चित्ता व बिबट्यामध्ये काही प्रमाणात संघर्ष होऊ शकतो. 

चित्ता करतो वेगाने शिकारचित्ता हा आपली शिकार केल्यानंतर ती संपूर्ण फस्त केल्याशिवाय जागेवरून हालत नाही. चित्ता अतिशय वेगाने धावतो व अवघ्या २० सेकंदात आपल्या भक्ष्याची शिकार करतो. 

जंगलात पुरेसे खाद्य बिबट्यांबरोबरच अस्वलांचीही येथे मोठी संख्या आहे. अस्वले शक्यतो चित्त्यांशी संघर्ष करणार नाहीत. मात्र, अस्वलांच्या पिल्लांवर चित्त्यांनी हल्ला केल्यास हा संघर्ष अटळ आहे. कुनो राष्ट्रीय उद्यानात नीलगाय, सांबर, हरीण, चितळ इत्यादी प्राणी आहेत.