शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

7th Pay Commission: नवरात्रीआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूशखबर? DA Hike सह तीन मोठ्या घोषणा होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 13:10 IST

7th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सप्टेंबर महिना आनंदाचा ठरणार आहे. कारण माध्यमांमधील वृत्तानुसार सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ

नवी दिल्ली-

7th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सप्टेंबर महिना आनंदाचा ठरणार आहे. कारण माध्यमांमधील वृत्तानुसार सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ, थकबाकी आणि फिटमेंट फॅक्टर संदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्राकडून यासंदर्भात निर्णय झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना पगारात मोठा फायदा होणार आहे. 

४ टक्के महागाई भत्त्यात वाढीची शक्यतामाध्यमांमधील माहितीनुसार केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करण्याची शक्यता आहे. जुलैच्या अखेरपर्यंत महागाई भत्त्यातील वाढीबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी शक्यता याआधी वर्तविण्यात आली होती. पण तसं काही झालं नाही. आता नवरात्रीआधी म्हणजेच सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना खुशखबर देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. 

केंद्राकडून महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांना मिळणारा ३४ टक्के महागाई भत्ता वाढून ३८ टक्के इतका होईल. सरकारनं कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये यावर्षी मार्च महिन्यात वाढ केली होती. मार्च महिन्यात ३ टक्के वाढ करण्यात आली होती आणि महागाई भत्ता ३१ टक्क्यांवरुन ३४ टक्के झाला होता. डीए हा कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्ट्रक्चरचाच भाग आहे. 

सरकार महागाईचा दर पाहून डीए बाबतचा निर्णय घेत असतं. जेणेकरुन कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर याचा परिणाम होणार नाही. सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ झाल्यास देशातील ५० लाख कर्मचाऱ्यांना आणि ६५ लाख पेंशनधारकांना मोठा फायदा होणार आहे. 

AICPI ची महत्वाची भूमिकासरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीचा महागाई भत्ता निश्चित करण्यासाठी एआयसीपीआय इंडेक्स अत्यंत महत्वाचा ठरतो. जूनचा AICPI चा इंडेक्स १२९.२ पॉइंटवर आला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ४ टक्के वाढ होईल अशी शक्यता आहे. फेब्रवारीनंतर AICPI इंडेक्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळत आहे. 

जानेवारी २०२२ मध्ये इंडेक्सचा आकडा १२५.१ इतकी होती. फेब्रुवारीत हा आकडा १२५ आला होता. तर मार्चमध्ये पुन्हा वाढ होऊन १२६ इतका झाला. एप्रिलमध्ये इंडेक्सचा आकडा वाढून १२७.७ वर पोहोचला. पुढे इंडेक्समध्ये सातत्यानं वाढ होतच आहे. मे महिन्यात १२९, तर जूनमध्ये १२९.२ पॉइंटवर पोहोचला आहे. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार