शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

देशात पाच दिवसांत ७.८६ लाख लोकांनी घेतली लस, लसीकरणानंतर चौघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 06:58 IST

लसीकरणानंतर सहा राज्यांतील दहा लोकांमध्ये प्रतिकूल प्रतिक्रिया झाल्याचे दिसून आले. यापैकी ७ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. अन्य तीन जण रुग्णालयात आहेत.

नवी दिल्ली : भारतात कोरोना लसीकरण मोहिमेच्या पाचव्या दिवशी, बुधवारी सायंकाळपर्यंत २० राज्यांतील ७,८६,८४२ आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. लसीकरणानंतर चार जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, तीन लोकांच्या मृत्यूशी लसीचा काही संबंध नसल्याचे मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. चौथ्या व्यक्तीच्या मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोहर अगनानी यांनी सांगितले.लसीकरणानंतर सहा राज्यांतील दहा लोकांमध्ये प्रतिकूल प्रतिक्रिया झाल्याचे दिसून आले. यापैकी ७ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. अन्य तीन जण रुग्णालयात आहेत. लसीकरणानंतर मृत्यू झालेल्यांत मुरादाबाद (उत्तर प्रदेश) , बेल्लारी, शिवमोगा (कर्नाटक) आणि निर्मल (तेलंगण) येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.कोविन ॲपमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. एकाच नावाच्या व्यक्तींची ओळख त्यांच्या मोबाईल नंबरवरून पटविता येऊ शकते. पहिल्या डोसनंतर तात्पुरते आणि दुसऱ्या डोसनंतर लसीकरणाचे अंतिम डिजिटल प्रमाणपत्र दिले जाईल.

सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा प्रतिक्षमन अधिकाऱ्यांना लसीकरणाबाबत दैनंदिन आढावा घेण्याचे आणि दिवसभरातील प्रगतीबाबत माहिती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याmedicineऔषधंdoctorडॉक्टर