शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
3
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
4
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
5
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
6
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
7
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
8
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
9
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
10
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
11
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
12
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
13
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
14
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
15
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
16
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
17
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
18
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
19
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
20
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी

एकाच दिवशी ७८ खासदार निलंबित; संसद सदस्यांवरील कारवाईचा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 06:14 IST

राज्यसभेतील ४५, लोकसभेतील ३३ सदस्यांवर कारवाई

संजय शर्मा / आदेश रावललोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : खासदारांच्या निलंबनात इतिहास रचत नव्या संसदेने एकाच दिवशी लोकसभेच्या ३३ आणि राज्यसभेच्या ४५ खासदारांना निलंबित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसदेत कठोर नियमांचे पालन करण्याबाबत भाष्य केले होते. या निलंबनाकडे त्या दृष्टीने पाहिले जात आहे. काही दिवसांपूर्वी १४ खासदारांना निलंबित केले होते.

संसदेतील घुसखोरीच्या मुद्द्यावरून सोमवारीही संसदेत मोठा गदारोळ झाला. कामकाज सुरू होताच लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली हाेती. 

६४ खासदारांचे निलंबन ४ दिवसांसाठीचसंसदेत घुसखाेरीच्या मुद्यावरून घोषणाबाजी केल्याने आणि हातात फलक घेऊन कामकाजात व्यत्यय आणल्याने ही कारवाई करण्यात आली. लोकसभेचे सत्र २२ डिसेंबरपर्यंत चालणार असल्याने यापैकी ६४ सदस्य ४ दिवसांसाठी निलंबित झाले आहेत.

 

लाेकसभा अन् राज्यसभेत काय घडले?लोकसभेत गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी करत हातात फलक घेत विरोधक घोषणाबाजी करू लागले. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला म्हणाले की, आपण सदस्यांनी असा निर्णय घेतला होता की, संसदेत अशा पोस्टरचा उपयोग होणार नाही. तरीही विरोधकांचा गदारोळ सुरूच होता. तीन सदस्यांनी थेट अध्यक्षांच्या पोडियमपर्यंत जाऊन घोषणा केल्याने त्यांना विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत निलंबित केले.राज्यसभेत कामकाज ४ वाजता सुरू झाले तेव्हा लोकसभेतील घुसखोरीच्या मुद्द्द्यावर विरोधक आक्रमक झाले. सुरक्षेतील त्रुटीबाबत सरकारने संसदेत उत्तर द्यावे, अशी मागणी विरोधक करू लागले. राज्यसभेत झालेल्या गदारोळानंतर ४५ खासदारांना हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित केले.

लोकसभेतील निलंबित खासदारकाँग्रेस (७)अधीर रंजन चौधरी, अँटो अँटोनी, के. मुरलीधरन, के. सुरेश, अमर सिंह, राजा मोहन उन्नीथन, गौरव गोगईतृणमूल काँग्रेस (९)कल्याण बॅनर्जी, अपरूपा पोद्दार, प्रसून बॅनर्जी, सौगत राय, शताब्दी राय, असित कुमार मंडल, प्रतिमा मंडल, काकोली घोष दस्तगीर, सुनील कुमार मंडलद्रमुक (९)टी. आर. बालू, ए. राजा, दयानिधी मारन, जी. सेल्वन, सी.एन. अन्नादुराई, डॉ. टी. सुमती, के. वीरासामी, एस. एस. पल्ली मणिक्कम, रामलिंगमइंडियन युनियन मुस्लीम लीग (२)केईटी मोहम्मद बशीर, के. नवासिकानीआरएसपी (१) के. एन. के. प्रेमचंद्रन जदयू (१) कौशलेन्द्र कुमार व्हीसीके (१) तिरुवक्कससरविशेषाधिकार समितीचा अहवाल येईलपर्यंत निलंबितके. जयकुमार, विजय वसंत, अब्दुल खालिक (तिघेही काँग्रेस)

राज्यसभेतील निलंबित खासदारकाँग्रेस (१२)प्रमोद तिवारी, जयराम रमेश, अमी याज्ञिक, नारनभाई जे राठवा, सय्यद नासीर हुसेन, फुलोदेवी नेताम, शक्तिसिंह गोहिल, के. सी. वेणुगोपाल, रजनी पाटील, रणजित रंजन, इम्रान प्रतापगढ़ी, रणदीप सिंग सुरजेवाला तृणमूल काँग्रेस (७)सुखेंदू शेखर रे, मोहम्मद नदीमुल हक, अबीर रंजन बिस्वास, संतनू सेन, मौसम नूर, प्रकाश चिक बराईक, समीरुल इस्लाम द्रमुक (४)एम. षण्मुगम, एन.आर. एलानगो, कनिमोझी एनवीएन सोमू, आर गिरिराजनराजद (२) मनोज कुमार झा, फैयाज अहमद माकपा (१) व्ही. शिवदासन जदयू (२) रामनाथ ठाकूर, अनिल हेगडे राष्ट्रवादी काँग्रेस (१) वंदना चव्हाण समाजवादी पार्टी (२) रामगोपाल यादव, जावेद अली खान झामुमो (१) महुआ माजी  अन्य (२) जोस के. मणि, अजितकुमार भुइया विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत निलंबन कायम राहणारजे. बी. माथेर हिशाम, एल हनुमंथय्या, नीरज डांगी, राजमणी पटेल, कुमार केतकर, जी.सी. चंद्रशेखर, बिनॉय विश्वम, संदोष कुमार पी., मोहम्मद अब्दुल्ला, जॉन ब्रिटासँड, ए. ए. रहीम.

टॅग्स :lok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभाParliamentसंसद