मदुराई (तामिळनाडू) : तामिळनाडूमध्ये एनडीएच्या बाजूने बदलाचे वारे वाहत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत, भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या व तामिळनाडूच्या प्राचीन परंपरांना विरोध करणाऱ्या द्रमुक पक्षाचा निवडणुकीच्या रणांगणात पराभव होईल, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी म्हटले आहे.
द्रमुक सरकारच्या मंत्रिमंडळातील ७५ टक्के मंत्र्यांवर गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप आहेत. ते भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले आहेत, असे फडणवीस म्हणाले. त्रिभाषा सूत्राला द्रमुककडून होणाऱ्या विरोधावर बोलताना फडणवीस म्हणाले, आपण एकच लोक आणि एकच राष्ट्र आहोत. आपल्या भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे व त्याचवेळी देशातील इतर भाषांचाही आदर केला पाहिजे.
हिंदी लादलेली कधीही स्वीकारणार नाही : स्टॅलिन
तंजावर (तमिळनाडू) : राज्य त्रि-भाषा सूत्र कधीही स्वीकारणार नाही, उलट तमिळ आणि इंग्रजी या दोन भाषांचे धोरण अवलंबेल, अशी भूूमिका तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सोमवारी घेतली.
केंद्र सरकार तमिळनाडूवर राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करण्यासाठी दबाव आणत आहे, ज्यामुळे राज्यावर हिंदी लादण्याचा मार्ग मोकळा होईल. आम्ही हे कधीही स्वीकारणार नाही, असे उदयनिधी तंजावर जिल्ह्यातील तिरुवैयारू येथे सभेत म्हणाले.
Web Summary : Fadnavis alleges 75% of Tamil Nadu ministers face criminal charges and are corrupt. He supports linguistic diversity but opposes imposing Hindi. Stalin vows to resist Hindi imposition, sticking to Tamil and English policies.
Web Summary : फडणवीस का आरोप है कि तमिलनाडु के 75% मंत्री आपराधिक आरोपों का सामना कर रहे हैं और भ्रष्ट हैं। उन्होंने भाषाई विविधता का समर्थन किया लेकिन हिंदी थोपने का विरोध किया। स्टालिन ने हिंदी थोपने का विरोध करते हुए तमिल और अंग्रेजी नीतियों पर कायम रहने की कसम खाई।