शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

७१२ कोटी रुपयांचा चिनी घोटाळा उघड; पार्ट टाइम कामातून पैशाचे आमिष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 09:11 IST

ई-कॉमर्स वेबसाइटवर विविध उत्पादनांचे बनावट रिव्ह्यू टाकण्याचा एक मोठा चिनी घोटाळा उघडकीस आला आहे.

हैदराबाद : ई-कॉमर्स वेबसाइटवर विविध उत्पादनांचे बनावट रिव्ह्यू टाकण्याचा एक मोठा चिनी घोटाळा उघडकीस आला आहे. हा तब्बल ७१२ कोटी रुपयांचा घोटाळा असून देशभरातून याप्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

 चीनमध्ये बसलेल्या लोकांच्या इशाऱ्यावर हे लोक काम करीत होते. या प्रकरणाचा हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेसोबतही संबंध असल्याचे आढळले आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

हैदराबादच्या पोलिसांनी एका फसवणुकीच्या प्रकरणात तक्रार दाखल केली होती. त्याच्या तपासातून हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आला.

कशी होत असे फसवणूक?

 लोकांना रिव्ह्यू करण्यााठी पार्ट टाइम कामाची ऑफर मिळते. त्यावर विश्वास ठेवून लोक नोंदणी करतात. 

या लोकांकडून सुरुवातीला गुंतवणुकीच्या नावाखाली हजार रुपये मागितले जातात. तक्रारकर्त्या व्यक्तीला सुरुवातीला ८०० रुपये नफा झाला. त्यानंतर त्याने २५ हजार रुपये गुंतविले. त्यावर २० हजारांचा फायदा झाला. मात्र, ही रक्कम काढण्याची परवानगी मिळाली नाही. उलट आणखी पैसे मागितले. असे करून त्याने २८ लाख रुपये गुंतविले; पण हे पैसे त्याला परत मिळाले नाही.