शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सराफ दुकानातून ७० हजारांची चोरी गुन्हा : बाजारपेठेत घडला प्रकार

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

संगमनेर : अज्ञात चोरट्यांनी बाजारपेठेतील साईनाथ ज्वेलर्स हे दुकान फोडून सुमारे ७० हजार रूपये किमतीच्या चांदीच्या वस्तूंसह लोखंडी तिजोरी चोरून नेल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

संगमनेर : अज्ञात चोरट्यांनी बाजारपेठेतील साईनाथ ज्वेलर्स हे दुकान फोडून सुमारे ७० हजार रूपये किमतीच्या चांदीच्या वस्तूंसह लोखंडी तिजोरी चोरून नेल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता सुवर्णकार संजय नारायण शहाणे (रा. गणेशनगर) हे नियमितपणे त्यांच्या मालकीचे बाजारपेठेत महात्मा फुले चौकातील साईनाथ ज्वेलर्स हे दुकान बंद करुन घरी गेले. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास दुकानाच्या एका बाजूच्या लोखंडी शटरचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला आणि दुकानातील लोखंडी तिजोरीची चोरी केली. या तिजोरीमध्ये सुमारे ७० हजार रूपये किमतीचे चांदीचे कोल्हापूरी घडणीचे दागिने होते. सकाळी शहाणे दुकान उघडण्यासाठी आले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. लागलीच त्यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक श्यामकांत सोमवंशी यांनी भेट देवून पाहणी केली. बाजारपेठेत झालेल्या या धाडसी चोरीमुळे सराफ व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश कमाले करीत आहेत. (प्रतिनिधी)
चौकट-
बाजारपेठेत धाडसी चोरी करणार्‍या आरोपींचा शोध लावण्यासाठी अहमदनगरहून श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. पथकातील श्वानाने अकोले नाक्यापर्यंत माग काढला. मात्र पुढे चोरटे कोणत्या दिशेला गेले, हे समजू शकले नाही.
------------------------------------------------------

घरासमोरुन बोलेरो जीप लांबविली
संगमनेर : अज्ञात चोरट्यांनी शहरामध्ये दिल्लीनाका परिसरात घरासमोर लावलेली सुमारे १ लाख ७५ हजार रुपये किमतीची बोलेरो जीप चोरून नेल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञात चोरट्यांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास दिल्लीनाका परिसरातील कोल्हेवाडी रस्त्यावर राहणार्‍या पोपट रावसाहेब अरगडे यांच्या घराच्या आवारात लावलेली सुमारे १ लाख ७५ हजार रूपये किमतीची बोलेरो जीप (क्रमांक एम. एच. १७, व्ही. ५५८०) चोरून नेली.
सकाळी जीपची चोरी झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी पोपट अरगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक घनवट करीत आहेत. (प्रतिनिधी)