शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

कारने दिली सायकल चालवणाऱ्या वृद्धाला जोरदार धडक; 8 किमी फरफटत नेलं, चिरडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 14:56 IST

एका कार चालकाने आधी सायकल चालवणाऱ्या वृद्धाला धडक दिली. धडकेनंतर कारच्या बोनेटवर अडकलेल्या वृद्धाला आठ किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं.

बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील कोतवा पोलीस स्टेशन परिसरात NH 27 वर एका अपघातात वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका कार चालकाने आधी सायकल चालवणाऱ्या वृद्धाला धडक दिली. धडकेनंतर कारच्या बोनेटवर अडकलेल्या वृद्धाला आठ किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. यानंतर कार चालकाने ब्रेक दाबून वृद्धाला बोनेटवरून खाली पाडले आणि चिरडलं. त्यानंतर कार चालक कारसह पळून गेला.

अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव शंकर चौधरी असं असून कोतवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बांगरा गावचे रहिवासी आहेत. मात्र, पिपराकोठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी ही कार ताब्यात घेतली. मात्र कारचा चालक व इतर प्रवासी पळून गेले. सायकलस्वार शंकर चौधरी हे बांगरा चौकाजवळ NH 27 ओलांडत होते. त्याचवेळी गोपालगंजकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने शंकर चौधरी यांच्या सायकलला धडक दिली.

धडकल्यानंतर शंकर चौधरी हे कारच्या बोनेटवर पडले त्यानंतर वायपरला पकडून धरलं. याच दरम्यान ते आरडाओरडा करत गाडी थांबवण्याची विनंती करत होते. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांनी ते पाहिले. गाडी थांबवण्यासाठी त्यांनी जोरजोरात आरडाओरडाही केला. तर काही लोकांनी गाडीचा पाठलाग सुरू केला. मात्र कार चालक त्याच वेगाने कार चालवत होता.

पाठीमागून येणारे लोक पाहून कोतवा येथील कदम चौकाजवळ चालकाने अचानक ब्रेक दाबला आणि शंकर पुढे पडले. याच दरम्यान त्यांचा जागीच मृत्यू झाला. कोतवा पोलीस ठाण्याचे प्रमुख अनुज कुमार यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्गावरील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आले आहे. पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे.परंतु कार चालक व गाडीतील सर्वजण पळून गेले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"