शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! 'या' जिल्ह्यात एक, दोन नव्हे, तर तब्बल ७० हजार 'विजय माल्ल्या'; बँका शोधून शोधून दमल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 12:15 IST

बँकांकडून 'विजय माल्ल्यां'चा शोध सुरू; कर्मचाऱ्यांना प्रचंड मनस्ताप

कानपूर: देशातील अनेक बँकांमध्ये मार्च एंडची तयारी सुरू आहे. कर्जाची परतफेड न करणाऱ्या ग्राहकांचा शोध बँकांकडून सुरू आहे. अनेकांनी लहान रकमेची कर्ज फेडलेली नाहीत. कर्ज बुडित खात्यानं गेल्यानं बँका वैतागल्या आहेत. कानपूरमधील ७० हजार ग्राहकांनी कर्ज फेडलेलं नाही. त्यामुळे बँका संकटात सापडल्या आहेत. ७० हजार ग्राहकांपैकी अनेकांनी पर्सनल, वाहनांसाठी कर्ज घेतलं आहे. तर काहींनी सरकारी योजनांच्या अंतर्गत कर्ज घेतलं आहे.

आर्थिक वर्ष संपत आल्यानं बँका कर्जाचा लेखाजोखा मांडत आहेत. मात्र कानपुरातील जवळपास ७० हजार जणांनी बँकांची झोप उडवली आहे. जिल्ह्यातील विविध बँकांकडून २.४ लाख जणांनी कर्ज घेतलं आहे. कर्जाची रक्कम २ लाखांच्या आत आहे. यापैकी ७० हजार जणांनी कर्जाचे तीन ते पाच हफ्ते भरलेले नाहीत. यातील बहुतांश जणांनी पर्सनल लोन घेतलं आहे. या कर्जासाठी काहीच तारण ठेवलं जात नाही. त्यामुळे ही रक्कम वसूल कशी करायची असा प्रश्न बँकांना पडला आहे. कर्ज घेतलेल्या अनेकांनी नोकरी बदलली आहे. काहींनी शहरच सोडलं आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेण्याचं आव्हान बँकांसमोर आहे.

छोट्या रकमेच्या कर्जाची गॅरंटी नाहीकाही सरकारी योजनांमधून १० ते ५० हजार रुपयांचं कर्ज लाभार्थ्यांना मिळतं. त्यांच्याकडून कोणतीही गॅरंटी घेतली जात नाही. अशा व्यक्तींकडून कर्जाची वसुली करणं अवघड जातं. यातील बहुतांश लोक भाड्याच्या घरात राहतात. कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे या व्यक्ती घरं बदलत असतात. त्यामुळे अशा व्यक्तींना दिलेल्या कर्जाची वसुली करणं बँकांसाठी आव्हानात्मक असतं.