शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एनटीसी जमीन घोटाळ्यात वाघेलांसह ७ जणांवर गुन्हा

By admin | Updated: June 18, 2015 01:29 IST

राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या (एनटीसी) मुंबईतील परळ येथील मधुसूदन गिरणीची मोक्याच्या ठिकाणची जमीन कोलकात्यातील खासगी कंपनीला

नवी दिल्ली: राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या (एनटीसी) मुंबईतील परळ येथील मधुसूदन गिरणीची मोक्याच्या ठिकाणची जमीन कोलकात्यातील खासगी कंपनीला कवडीमोल दराने विकल्याप्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) बुधवारी माजी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री शंकरसिंह वाघेला यांच्यासह सात जणांविरुद्ध औपचारिक गुन्हा नोंदविला. या सर्वांनी गुन्हेगारी स्वरूपाचा कट करून सरकारचे नुकसान केले,असा आरोप आहे.या जमीन विक्री व्यवहारात सरकारचे ७०६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. वाघेलांखेरीज ज्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे त्यांत ‘एनटीसी’चे तत्कालिन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रामचंद्रन पिल्लई, तांत्रिक संचालक आर.के. शर्मा व वरिष्ठ व्यवस्थापक (कायदा) एम. के. खरे, कोलकात्याची मे. हॉल अ‍ॅण्ड अँडरसन ही कंपनी आणि त्यांचे संचालक कमलेश मेहता यांचा समावेश आहे. सूत्रांनुसार दिल्लीत पिल्लई यांच्या घरात १.५ कोटी रुपयांच्या बँकेतील मुदत ठेवीची पावती जप्त करण्यात आली तर त्यांचा बँक लकरही सील करण्यात आला. शर्मा यांचे दोन लॉकर सील करून त्यांची क्रेडिट कार्डे ताब्यात घेण्यात आली. खरे यांच्या घरी ४५ लाख रुपयांच्या मुदत ठेवी मिळाल्या व त्यांचा लॉकरही सील केला . वाघेला यांच्या निवासस्थानी १३.३३ लाख रुपयांची रोकड मिळाली. ‘एनटीसी’ची कार्यालये, हॉल आणि अँडरसन कंपनीचे कोलकत्यातील कार्यालय आणि लोटस एन्टरप्रायजेस येथेही शोधासाठी छापे घालण्यात आले.काय झाला व्यवहार?या गिरणीच्या एकूण ८०,७८५ चौ. मीटर जमिनीपैकी २७,५०० मीटर जमीन मेहता यांच्या हॉल अँड अँडरसन कंपनीस बाजारभावापेक्षा ७०२ कोटी रुपये कमी म्हणजे २९.३५ कोटी रुपयांना विकण्यात आली. या गिरणीची आणखी ४,०८० चौ. मीटर जमीन न्यू जॅक प्रिंटिंग प्रेस प्रा. लि. या कंपनीस बाजारभावापेक्षा कितीतरी कमी भावाने विकली गेली होती व त्यासंदर्भातही ‘सीबीआय’ने पिल्लई व इतरांविरुद्ध स्वतंत्र प्रकरण नोंदविले असून त्याचाही तपास सुरु आहे. पिल्लई यांनी ही जमीन न्यू जॅक कंपनीस भाडेपट्ट्याची रक्कम ९० कोटी रुपयांनी दोन कोटी रुपये एवढी कमी करून भाड्याने दिली. भाडे थकविले तरी नंतर त्यांनाच ती जमीन १७ कोटी रुपयांना विकली गेली, असा आरोप आहे.