शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या कारवाईत ७ नक्षली ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:49 IST

छत्तीसगडमध्ये चकमक : तेलंगणा पोलिसांच्या साह्याने कारवाई

रायपूर : छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील जंगलात राज्य पोलीस व तेलंगणा पोलीस यांनी शुक्रवारी सकाळी केलेल्या संयुक्त कारवाईत सात अतिरेकी ठार झाले. इपेंटाच्या जंगलात पोलीस व नक्षलवादी यांच्यात चकमक उडाली होती. ही अलीकडील काळातील छत्तीसगडमधील मोठी कारवाई आहे.तेलंगणा पोलिसांचे नक्षलवादीविरोधी पथक व छत्तीसगडमधील सुरक्षा दलांनी येथील जंगलात नक्षलवाद्यांचा शोध सुरू केला होता. दोन्ही राज्यांच्या सीमेवर असलेल्या या भागात काही नक्षलवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. राजधानी रायपूरहून ५00 किलोमीटरवर असलेल्या या भागात त्यांचा शोध सुरू असतानाच, नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. त्याला पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मृतांमध्ये काही महिलाही आहेत. तसेच जिथे चकमक झाली, तिथे पोलिसांना काही शस्त्रे आणि नक्षलवाद्याचे प्रचार साहित्य सापडले, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. या आधी मार्चमध्ये नक्षलवादीविरोधी पथकाने याच जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा शोध सुरू केला होता. तेव्हा झालेल्या चकमकीत १0 नक्षलवादी मारले गेले होते. त्यात सात महिलांचा समावेश होता. या आधी ३९ ठारही चार दिवसांतील दुसरी कारवाई आहे. या आधी गडचिरोलीच्या जंगलात राज्य पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात जोरदार कारवाई केली होती. अनेक तास चाललेल्या चकमकीमध्ये ३९ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. या कारवायांमध्ये मिळून या आठवड्यात ४६ नक्षली मारले गेले आहेत.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी