शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

न्यायासाठी ७ न्यायमूर्तींची सर्वोच्च न्यायालयात धाव! सरन्यायाधीशही आश्चर्यचकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 08:10 IST

जीपीएफ खाते बंद करण्याच्या निर्देशाला दिले आव्हान

पाटणा : ‘काय? न्यायाधीशांचे जीपीएफ खाते बंद? याचिकाकर्ता कोण आहे?’ असा प्रश्न खुद्द देशाच्या सरन्यायाधीशांनी केला. पाटणा उच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींचे सामान्य भविष्य निर्वाह निधी (जीपीएफ) खाते बंद करण्यात आले आहे. याबाबत सातही न्यायमूर्तींनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मंगळवारी जेव्हा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले, तेव्हा सरन्यायाधीशही चकित झाले. या प्रकरणाची सुनावणी त्यांनी २४ फेब्रुवारीला ठेवली आहे.

उच्च न्यायालयाचे सात विद्यमान न्यायाधीश भेदभावाविरोधात न्याय मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्याची कदाचित देशाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असावी. पाटणा उच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाला सुनावणी करण्याची विनंती केल्यावर सरन्यायाधीशांनाही धक्का बसला. केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयाने जीपीएफ खाती बंद करण्याच्या जारी केलेल्या निर्देशाला सर्व न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा यांच्या खंडपीठाकडे या प्रकरणाच्या लवकर सुनावणीसाठी न्यायमूर्ती शैलेंद्र सिंह, न्यायमूर्ती अरुण कुमार झा, न्यायमूर्ती जितेंद्र कुमार, न्यायमूर्ती आलोक कुमार पांडे, न्यायमूर्ती सुनील दत्त मिश्रा, न्यायमूर्ती चंद्रप्रकाश सिंह आणि न्यायमूर्ती चंद्रशेखर झा यांनी याचिका दाखल केली आहे. या सर्वांची २२ जून रोजी न्यायिक सेवा कोट्यातून न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नियुक्तीनंतर या सर्वांचे जीपीएफ खाते बंद करण्यात आले. 

न्यायाधीशांसोबत भेदभाव२००५नंतर न्यायिक सेवेत नियुक्ती झाल्यामुळे या सर्व न्यायाधीशांची जीपीएफ खाती बंद करण्यात आली होती. बार कोट्यातून नेमलेल्या न्यायाधीशांना जी सुविधा दिली जाते, ती सुविधा त्यांनाही मिळायला हवी, असे या न्यायमूर्तींचे म्हणणे आहे.