६९ उपद्रवी जिल्ातून आठवडाभरासाठी हद्दपार
By admin | Updated: April 13, 2016 00:32 IST
जळगाव: आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील ६९ उपद्रवींना १९ एप्रिलपर्यंत जिल्ातून हद्दपार करण्यात आले आहे. प्रांताधिकारी अभिजीत भांडे यांनी मंगळवारी हे आदेश काढल्याचे वृत्त आहे. गेल्या आठवड्यात २३ जणांना एक महिन्यासाठी हद्दपार करण्यात होते.कलम १४४ (२) अन्वये त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
६९ उपद्रवी जिल्ातून आठवडाभरासाठी हद्दपार
जळगाव: आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील ६९ उपद्रवींना १९ एप्रिलपर्यंत जिल्ातून हद्दपार करण्यात आले आहे. प्रांताधिकारी अभिजीत भांडे यांनी मंगळवारी हे आदेश काढल्याचे वृत्त आहे. गेल्या आठवड्यात २३ जणांना एक महिन्यासाठी हद्दपार करण्यात होते.कलम १४४ (२) अन्वये त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सण व उत्सवाला गालबोट लागू नये यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढून त्यांचे हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी सर्व प्रभारी अधिकार्यांना दिले होते. त्यानुसार पाच पोलीस स्टेशनमधून ९२ जणांचे प्रस्ताव प्रांताधिकार्यांकडे पाठविण्यात आले होते. त्यातील रामानंद नगरच्या सहा तर शनिपेठच्या १७ अशा एकूण २३ प्रस्तावाला प्रांताधिकार्यांनी मंजूरी दिली होती.आता उर्वरित ६९ आरोपींना हद्दपार करण्यात आले आहे. त्यांना शहर सोडण्याच्या नोटीसा बजावण्यात येणार आहेत.