शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

देशात पाच वर्षांत 68 सहकारी बँका बंद, 14 बँका महाराष्ट्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 11:19 IST

२०२० च्या आर्थिक वर्षात बँकांनी ४८०० कोटी रुपये केले हाेते निर्लेखित

हरीश गुप्ता लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशात गेल्या पाच वर्षांत तब्बल ६८ नागरी सहकारी बँका आणि सोसायट्या बंद पडल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत बंद झालेल्या सहकारी बँकांमध्ये एकट्या महाराष्ट्राचा वाटा १४ बँकांसह सर्वाधिक होता तर, इतर सात मोठ्या बँकांमध्ये विलीन किंवा एकत्रिकरण करण्यात आले आहे. गत पाच वर्षांत देशातील २६ सहकारी बँका बंद पडल्या तर, एकूण ४२ सहकारी बँका इतर बँकांमध्ये विलीन कऱण्यात आल्या. या ४२ पैकी महाराष्ट्राचा वाटा ७ इतका होता. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्या बँकांचे परवाने रद्द केले आहेत किंवा त्यांचे इतर बँकांमध्ये विलीनीकरण केले आहे. २०२१ मध्ये १५३१ नागरी सहकारी बँका आणि ९७,००६ ग्रामीण सहकारी बँका कार्यरत असल्याने हा आकडा कमी मानला जातो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडील डेटा सांगतो की, नागरी सहकारी बँकांना आर्थिक वर्ष २०१९ मधील ३,५४४ कोटींच्या नफ्याच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२० मध्ये ४,८०० कोटींचे संचयी नुकसान झाले आहे. मुख्यत: उच्च एनपीए आणि कमी गुंतवणुकीमुळे बंद पडलेल्या सर्वाधिक बँका या महाराष्ट्र आणि केरळातील आहेत.  या राज्यात बंद पडलेल्या २६ पैकी २ बँका गोव्यातील आहेत. अर्थात, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची तुलना केल्यास सहकारी बँकांचे एनपीए किरकोळ मानले जातात. सरकारने पावसाळी अधिवेशनात संसदेत कबूल केले की, ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे सकल एनपीए (अनुत्पादक मालमत्ता) ५.६० लाख कोटी रुपये होती. यापैकी मोठ्या बँकांनी तीन आर्थिक वर्षात २०१८-१९, २०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये ४.९० लाख कोटी निर्लेखित (राईट ऑफ) केले.

नियम आधीपेक्षा कठोर n सहकार मंत्रालय आता गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आल्यानंतर सरकारने सहकारी बँकांचे नियमन करणारे नियम कठोर केले आहेत. त्यांना आरबीआयच्या कठोर कक्षेत आणले आहे. n सार्वजनिक क्षेत्रातील ८ बँकांही एनपीएमुळे बंद झाल्या आहेत आणि त्या इतर बँकांमध्ये विलीन करण्यात आल्या आहेत.

बँका बंद पडण्याची कारणे काय? या बँकांचा एनपीए प्रचंड प्रमाणात वाढला होता. त्यांच्याकडील गुंतवणूक आटू लागली होती. रिझर्व्ह बँकेने काही बँकांवर कारवाई केली होती.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकBanking Sectorबँकिंग क्षेत्र