शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत IIT मधील ६५ विद्यार्थ्यांची आत्महत्या; कानपूरमध्ये ९, मुंबईत एकाने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 10:02 IST

संचालकांना जबाबदार धरण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: देशातील आयआयटीमध्ये पाच वर्षांत ६५ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात गेल्या दोन वर्षांतच सुमारे ३० विद्यार्थ्यांनी स्वत:चे जीवन संपविले असून, त्यात आयआयटी कानपूरमध्ये सर्वाधिक ९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आयआयटी खरगपूरमध्ये ७ आत्महत्या झाल्या आहेत. २ वर्षांत आयआयटी मुंबईमध्ये एका विद्यार्थ्याने स्वत:ला संपविले. यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

कानपूरचे माजी विद्यार्थी आणि ग्लोबल आयआयटी ॲल्युमनी सपोर्ट ग्रुपचे संस्थापक धीरज सिंग यांनी जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या आत्महत्यांच्या अभ्यासातून ही बाब समोर आली. कानपूरमध्ये मंगळवारी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला.

संचालकांना जबाबदार धरण्याची मागणी

सर्वोच्च न्यायालयाने कलम २१ अंतर्गत मानसिक आरोग्य हा जगण्याच्या अधिकाराचा अविभाज्य भाग म्हटले आहे. तसेच, ‘साहा विरुद्ध आंध्र प्रदेश’ खटल्यात न्यायालयाने आदेश दिले आहेत की विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य ही घटनात्मक आणि संस्थात्मक जबाबदारी मानली जावी, असे धीरज सिंग यांनी नमूद केले.आयआयटी कानपूर कॅम्पसमध्ये ही नववी आत्महत्या असल्याने, शिक्षण मंत्रालयाने तेथील संचालकांना जबाबदार धरावे आणि परिस्थिती सुधारण्यासाठी नवीन प्रमुखांची नियुक्ती करण्याचा विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

कानपूरमध्ये सर्वाधिक घटना

गेल्या २ वर्षांत देशातील आयआयटीमध्ये ३० आत्महत्या झाल्या आहेत. यातील ९ म्हणजेच जवळपास ३० टक्के आत्महत्या एकट्या आयआयटी कानपूरमध्ये झाल्या. देशातील २३ आयआयटींपैकी हा सर्वाधिक आकडा आहे. तर आयआयटी मुंबईमध्ये १ आत्महत्या झाली. एकीकडे आयआयटी मुंबईमध्ये जास्त विद्यार्थी असताना हे प्रमाण कमी आहे. आयआयटी कानपूरमध्ये हे प्रमाण अधिक आहे. यामागे विद्यार्थ्यांवरील अतिरिक्त शैक्षणिक ताण हे आहे. तसेच आयआयटी कानपूरमधील मानसिक आरोग्याच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, असे सिंग यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : IIT Suicides: 65 Students Died in Five Years, Kanpur Leads

Web Summary : Sixty-five IIT students died by suicide in five years, with 30 occurring recently. IIT Kanpur reported nine deaths. Mental health concerns are escalating; calls are being made for institutional accountability and improved student support systems.
टॅग्स :IIT Mumbaiआयआयटी मुंबई