नवी दिल्ली : दिल्लीत सरकारी निवासस्थानी जळालेल्या नोटा सापडल्याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. यशवंत वर्मा यांना बडतर्फ करण्यासंबंधीचा प्रस्ताव सोमवारी राज्यसभेत दाखल करण्यात आला. यासंबंधी योग्य प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश राज्यसभा सरचिटणीसांना देण्यात आले. या प्रस्तावावर ६३ खासदारांच्या सह्या आहेत.अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. यशवंत वर्मा यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्यासाठी सूचीबद्ध करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला.
केवळ आडनावाचा उल्लेख केल्यामुळे फटकारलेअलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. यशवंत वर्मा यांचा उल्लेख ॲड. मॅथ्यूज नेदुम्परा यांनी केवळ आडनावाने केला, तेव्हा सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्यांना फटकारले. ते तुमचे मित्र आहेत का? ते सध्याही न्यायमूर्ती आहेत. थोडी तरी शालीनता दाखवा. तुम्ही एका विद्वान न्यायाधीशांबाबत बोलत आहात. ते सध्याही न्यायालायचे न्यायाधीश आहेत, असे त्यांनी सुनावले.वकील म्हणाले की, ही प्रतिष्ठा त्यांना लागू होते, असे मला वाटत नाही. कृपया हे प्रकरण सूचीबद्ध करावे. सरन्यायाधीश म्हणाले की, कृपया, न्यायालयाला आदेश देऊ नका. वकील म्हणाले की, मी केवळ आग्रह धरत आहे.