शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशात ६० लाख बोगस मतदार; चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 01:15 IST

मध्य प्रदेशात ६० लाख बोगस मतदार असल्याचा आरोप काँग्रेसने केल्यानंतर निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी रविवारी आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन बोगस मतदारांबाबत तक्रार केली आहे.

नवी दिल्ली : मध्य प्रदेशात ६० लाख बोगस मतदार असल्याचा आरोप काँग्रेसने केल्यानंतर निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी रविवारी आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन बोगस मतदारांबाबत तक्रार केली आहे. काँग्रेसने हा आरोप करताना निवडणूक आयोगाकडे याबाबत पुरावे सादर केले आहेत.मध्य प्रदेशात ५ कोटी मतदार असून काँग्रेसने केलेल्या दाव्यानुसार, यातील १२ टक्के मतदार बोगस आहेत. गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपा यांच्यातील मतांचा फरक हा ८.५ टक्के इतका होता. या वर्षी नोव्हेंबरमध्ये मध्य प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना कमलनाथ आणि शिंदे यांनी याबाबत अनेक उदाहरणे दाखविली. उदाहरणार्थ, मध्य प्रदेशातील भोजपूर मतदारसंघात एका महिलेचे नाव वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर २६ वेळा आहे. कमलनाथ म्हणाले की, आयोगाला आम्ही पुरावे दिले आहेत की, राज्यात ६० लाख बोगस मतदार आहेत आणि हे चुकून झालेले नाही. राज्यातील भाजपा सरकारच्या आदेशावरून हे झाले आहे.चौकशीसाठी दोन पथकेमध्यप्रदेशात ६० लाख बोगस मतदार असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी पुराव्यासह केल्यानंतर निवडणूक आयोगाने याची दखल घेत या प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन पथकांची स्थापना केली आहे. या पथकांकडून ७ जूनपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्यात येणार आहे. आयोगाने म्हटले आहे की, जर हेतुपुरस्सर चूक दिसून आली तर, उचित कारवाई करण्यास जबाबदारी निश्चित करण्यात येईल.काँग्रेसने १०१ मतदारसंघांत २४.६५ लाख बोगस मतदार शोधले. ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढली त्या तुलनेत मतदारांची संख्या विसंगती दर्शवित आहे. हा प्रकार भाजपाकडून करण्यात आला. १० वर्षांत लोकसंख्या २४ टक्क्यांनी वाढत असेल तर मतदार ४० टक्के कसे वाढू शकतात, असा सवालही शिंदे यांनी केला आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक