६ लाखांचा गुटखा व पानमसाला जप्त
By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST
पुणे : शहरात प्रबंधित अन्नपदार्थांचा साठा मोठ्या प्रमाणात सापडत असून आज शहरात अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत ६ लाख ४९ हजारांचा गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने सोमवारी नाना पेठेतील अनिल अडांगळे यांच्या गोडावूनमधून प्रतिबंधित करण्यात आलेला गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला.
६ लाखांचा गुटखा व पानमसाला जप्त
पुणे : शहरात प्रबंधित अन्नपदार्थांचा साठा मोठ्या प्रमाणात सापडत असून आज शहरात अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत ६ लाख ४९ हजारांचा गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने सोमवारी नाना पेठेतील अनिल अडांगळे यांच्या गोडावूनमधून प्रतिबंधित करण्यात आलेला गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या माहितीनूसार सोमवारी अन्न सुरक्षा अधिकारी योगेश ढाणे, सचिन आढाव, अन्न सहाय्यक आयुक्त संजय शिंदे, दिलीप संगत व संजय नारागुडे यांच्या पथकाने धाड टाकली. ही धाड घातली असता सदर गोडावून बंद होते. त्यामुळे गोडावूनचे मालक अडांगळे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला. परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने समर्थ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकांच्या मदतीने गोडावूनचे कुलूप तोडून हा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती पुण्याचे अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी दिली. या प्रकरणी अनिल अडांगळे यांच्याविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. अशाप्रकारे शहरात प्रतिबंध असलेल्या गुटखा व पानमसाल्याची विक्री होताना आढळले तर वागरीकांनी अन्न व औषध प्रशासनास कळवावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यातच आले आहे.