शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

भोंगळ कारभार! "मी जिवंत आहे", महिला 19 वर्षे अधिकाऱ्यांकडे मारतेय चकरा, म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 14:03 IST

आई आणि मुलगा दुसऱ्याच्या घरात राहून दिवस काढत आहेत. मुलाला इतर लोकांकडे मजूर म्हणून काम करत आहे.

मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एका 59 वर्षीय महिलेने पंचायत, एसडीएम, जिल्हाधिकारी, आयुक्त आणि आमदार यांच्याकडे गेल्या 19 वर्षांपासून कागदावर स्वत:ला जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी दाद मागितली आहे, परंतु अद्याप कोणतीही समस्या सुटलेली नाही. महिलेला ना अनुकंपा नियुक्तीचा लाभ मिळत आहे, ना पीएफ, ना कोणत्याही सरकारी योजनेचा फायदा. गेल्या अनेक वर्षांपासून तिला इतर लोकांच्या आधाराने जगावे लागत आहे.

सागर येथे राहणाऱ्या 59 वर्षीय महिलेचे पती मुलायम सिंह हे अनूपपूर जिल्ह्यातील कोळसा खाणीत फायटर म्हणून काम करायचे. 2003 मध्ये आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. आता उदरनिर्वाहाचे आव्हान कुटुंबासमोर होते. मुलगा राहुल खूपच लहान होता, त्यामुळे आईनेच अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज केला होता. याच दरम्यान महिलेच्या पायाखालची जमीन सरकली. 

एक कागद सापडला ज्यात 40 वर्षांपूर्वी 1983 मध्ये तिचा मृत्यू झाला होता. मकरोनिया ग्रामपंचायतीने हे जाहीर केले. 2004 मध्ये मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्यात आले होते. तेव्हापासून ती महिला सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहे, जेणेकरून मृत्यू प्रमाणपत्र नाकारण्यात येईल. या पत्रामुळे महिलेला अनुकंपा नियुक्तीच मिळाली नाही तसेच कोणत्याही सरकारी योजनेचा लाभही मिळू शकला नाही. 

आई आणि मुलगा दुसऱ्याच्या घरात राहून दिवस काढत आहेत. मुलाला इतर लोकांकडे मजूर म्हणून काम करत आहे. एकीकडे जिल्हा आणि महापालिकेचे अधिकारी याप्रकरणी काहीही बोलणे टाळत असल्याचे दिसत आहे. मात्र, या प्रकरणाची माहिती समोर आल्याचे सागरचे जिल्हाधिकारी दीपक आर्य यांचे म्हणणे आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशी करण्यास सांगितले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.