शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात ५,८४३ किलोमीटर रेल्वेमार्गांची कामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 07:00 IST

यंदा ४,६४७ कोटींची तरतूद : १६ नवे रेल्वेमार्ग, १७ मार्गांचे दुपदरीकरण व चार ठिकाणी गेज परिवर्तन

- नितिन अग्रवाल

नवी दिल्ली : महाराष्ट्रात ६९ हजार १८१ कोटी रुपये खर्चून ५,८४३ किलोमीटर लांबीचे रेल्वेमार्ग उभारण्याचे काम जोरात सुरू असून, ८0६ किलोमीटरचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वेसाठी ४,६४७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, महाराष्ट्रात १६ नवे रेल्वेमार्ग उभारण्यात येत असून, १७ मार्गांचे दुपदरीकरण व चार ठिकाणी गेज परिवर्तन होत आहे. या ३७ रेल्वे योजनांची कामे सध्या सुरू असून, काही पूर्णही झाली आहेत. या योजनांवर या वर्षीच्या माचपर्यंत १२ हजार ७0२ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.आताच्या अर्थसंकल्पात या कामांना वेग देण्यासाठी ४,६४७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री गोयल यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांमध्ये ९८ रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या असून, त्या महाराष्ट्रातील विविध स्थानकांमार्गे जातात.विलंबाची कारणेरामदास तडस यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात पीयूष गोयल म्हणाले की, रेल्वेची कामे पूर्ण करण्याचा कालावधी निश्चित करणे कधीच शक्य होत नाही.राज्य सरकारतर्फे केले जाणारे जमिनीचे संपादन, वन व अन्य खात्यांची मंजुरी मिळण्यास लागणारा वेळ, भौगोलिक परिस्थिती, हवामान, तसेच संप, आंदोलने यामुळे अनेकदा कामे पूर्ण होण्यास अधिक वेळ लागतो. याशिवाय न्यायालयात प्रकरण गेल्यास तिथे किती वेळ लागेल, हे सांगता येत नाही आणि अनेकदा कंत्राटदारांची स्थिती व अटी यामुळेही कामांना विलंब होऊ शकतो.