शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याचे पाणी देणाऱ्या ५७,४०० योजना

By admin | Updated: August 12, 2016 03:12 IST

राज्यांतील ग्रामीण भागांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणाऱ्या ५७ हजार ४०० योजना सुरू आहेत आणि २०१५-२०१६ वर्षात या कामासाठी ४,३०० कोटी रुपये खर्च करण्यात आले

नवी दिल्ली : वेगवेगळ््या राज्यांतील ग्रामीण भागांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणाऱ्या ५७ हजार ४०० योजना सुरू आहेत आणि २०१५-२०१६ वर्षात या कामासाठी ४,३०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. ही माहिती गुरुवारी पेयजल आणि स्वच्छता खात्याचे मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत दिली. राज्यांना २०१५-२०१६ या वर्षात ४ हजार ३७३ कोटी रुपये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मंजूर करण्यात आले होते. त्यातील ४,३६९.५५ कोटी रुपये खर्च करण्यात आले. वेगवेगळ््या राज्यांमध्ये ग्रामीण जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आठ आॅगस्ट रोजी काम ५७,४८९ योजनांद्वारे होत आहे, असे ते म्हणाले. जम्मू आणि काश्मीरमध्ये सध्या १,८३८ पेयजल योजना सुरू असल्याचे सिंह यांनी प्रश्नोत्तर तासात सांगितले. पिण्याचे पाणी आणि स्वच्छता हे राज्यांचे विषय आहेत. केंद्र सरकारची यातील भूमिका ही राज्यांना तांत्रिक आणि आर्थिक साह्य देणे आणि अशा कार्यक्रमांवर देखरेख ठेवण्याची आहे, असे तोमर म्हणाले. ‘स्वच्छ भारत मिशन’ ग्रामीणबद्दल (एसबीएम-जी) बोलताना तोमर म्हणाले की, या कार्यक्रमाचे लक्ष्य हे दोन आॅक्टोबर २०१९ पर्यंत स्वच्छ भारत करण्याचे आणि हा कार्यक्रम ज्यांच्याशी संबंधित आहे त्या लोकांचा दृष्टिकोन बदलण्याचा आहे. २०१५-२०१६ मध्ये एसबीएम-जीसाठी ६,५२५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले तर त्यातील ६,५२४.५२ कोटी रुपये खर्च करण्यात आले. दोन आॅक्टोबर २०१४ रोजी एसबीएम-जीची सुरवात झाली तेव्हापासून आठ आॅगस्ट २०१६ पर्यंत २१२.९८ लाख स्वच्छतागृहे बांधण्यात आली. याशिवाय एकूण १७ जिल्हे, २३२ गट, ३२,३९५ ग्राम पंचायती आणि ७२,७२७ खेडी उघड्यावर संडासला जाण्यापासून मुक्त असल्याचे जाहीर करण्यात आले आहे, असेही तोमर म्हणाले.