शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! देशभरात साडेपाच हजारांवर खवले मांजरांची शिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 06:57 IST

तस्करी रोखण्यासाठी आता ॲक्शन प्लॅन

- गोपालकृष्ण मांडवकरनागपूर : अत्यंत दुर्मीळ असलेल्या खवले मांजर या प्राण्याच्या शिकारीचा देशभरातील आकडा डोळे विस्फारायला लावणारा आहे. मागील ९ वर्षांत देशात ५,७६२ खवले मांजरांची शिकार झाल्याची एका संस्थेच्या अहवालातील आकडेवारी आहे. संघटित गुन्हेगारांच्या माध्यमातून या प्राण्याची विदेशात तस्करी होत असल्याचेही पुढे आले आहे. या दुर्मीळ प्राण्याची तस्करी रोखण्यासाठी वनविभाग आता विशेष ॲक्शन प्लॅन राबविणार आहे. राज्यात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात हा प्राणी आढळतो. त्यामुळे त्याच्या तस्करीचे आणि शिकारीचे प्रमाणही याच भागात अधिक आढळते. या प्राण्याच्या शिकारी केवळ मांस खाण्यासाठी होतात की यामागे संघटित तस्करांची टोळी आहे, याचा अभ्यास ही समिती करणार आहे. ‘ट्रॅफिक’ या संस्थेने केलेल्या अभ्यासामध्ये २००९ ते २०१७ या काळात ५,७६२ खवले मांजरांची शिकार झाल्याची नोंद आहे. नागपूर जिल्ह्यात १९ मे रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पातील चोरबाहुली वन परिक्षेत्रात वनविभागाच्या पथकाने शिजवायला घातलेल्या मांसासह दोन आरोपींना अटक केली होती. तस्करी होते विदेशातखवले मांजराची तस्करी विदेशात होते. त्याच्या पाठीवरील खवल्यांपासून तयार केल्या जाणाऱ्या पावडरचा वापर औषधासाठी केला जातो. चीनमध्ये त्याचा सर्वाधिक वापर होतो. यासोबतच मलेशिया, व्हिएतनाममध्येही या प्राण्याची तस्करी होते. एक लाख रुपयात एक प्राणी विकला जातो. प्रौढ खवले मांजराचे वजन एक किलो असते. तांत्रिक गटाची स्थापनाखवले मांजराच्या संरक्षण व संवर्धनासाठी वनविभागाकडून कृती आराखडा आखला जाणार आहे. वन्यजीव व्यवस्थापन, संशोधन व वन्यजीव गुन्हे क्षेत्रातील तज्ज्ञांना समाविष्ट करून तांत्रिक गटाची स्थापना करण्यात आली आहे. पुणे येथील वन्यजीव वनसंरक्षक रमेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. तांत्रिक गटाची स्थापनाखवले मांजराच्या संरक्षण व संवर्धनासाठी वनविभागाकडून कृती आराखडा आखला जाणार आहे. वन्यजीव व्यवस्थापन, संशोधन व वन्यजीव गुन्हे क्षेत्रातील तज्ज्ञांना समाविष्ट करून तांत्रिक गटाची स्थापना करण्यात आली आहे. पुणे येथील वन्यजीव वनसंरक्षक रमेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे.