शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

निमलष्करी दलांमध्ये ५४ हजारांची महाभरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 22:45 IST

सीआरपीएफमध्ये २१ हजारांहून अधिक जागा

नवी दिल्ली : सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपीसारख्या निमलष्करी दलांमध्ये ५४ हजार जवानांची भरती करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यातील एकट्या सीआरपीएफमध्ये सर्वात जास्त म्हणजे २१,५६६ जवानांची भरती करण्यात येतील.स्टाफ सीलेक्शन कमिशनतर्फे या महाभरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार ४७३०७ पुरुष व ७६४६ महिला जवानांची कॉन्स्टेबल पदासाठी भरती करण्यात येणार आहे. सीआयएसएफ, सशस्त्र सीमा दल, आसाम रायफल्स, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), सेक्रेटरिएट सिक्युरिटी फोर्स (एसएसएफ) यांच्यासाठीही ही भरती होणार आहे.सूत्रांनी सांगितले की, निमलष्करी दलांमध्ये नव्या बटालियनची स्थापना करण्यात येणार आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर जवानांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.२० आॅगस्टपर्यंत मुदतया पदांसाठी १८ ते २३ वर्षे वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करावेत, असे सुचविण्यात आले आहे. अर्जदार किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षा, शारीरिक क्षमतेची चाचणी, अंतिम फेरीतील वैद्यकीय चाचणी अशा विविध प्रकारच्या चाचण्यांना सामोरे जावे लागणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २० आॅगस्ट आहे.

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दल