शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

मोदींच्या ७७ पैकी ५४ मंत्र्यांनी मालमत्तेचा तपशीलच दिला नाही, जेटली सर्वाधिक श्रीमंत, पासवानांकडे सर्वांत कमी संपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 04:16 IST

३१ आॅगस्ट २०१७ पर्यंत आपल्या मालमत्तांचा तपशील सादर करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांना दिलेले आदेश ७७ पैकी केवळ २३ मंत्र्यांनीच पाळले आहेत. ५४ मंत्र्यांनी पंतप्रधानांच्या आदेशाचे पालन केलेले नाही.

- हरीष गुप्ता / लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ३१ आॅगस्ट २०१७ पर्यंत आपल्या मालमत्तांचा तपशील सादर करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांना दिलेले आदेश ७७ पैकी केवळ २३ मंत्र्यांनीच पाळले आहेत. ५४ मंत्र्यांनी पंतप्रधानांच्या आदेशाचे पालन केलेले नाही.पंतप्रधानांसह २८ कॅबिनेट मंत्री असून, त्यापैकी १९ जणांनी विवरणपत्र सादर केले आहे. स्वतंत्र पदभार असलेल्यांसह ४८ राज्यमंत्री आहेत. त्यातील फक्त ४ जणांनी सांपत्तिक/कर्जविषयक विवरणपत्र सादर केले आहे. पंतप्रधानांनी सर्वांत आधी आपले विवरणपत्र सादर केले. त्यांच्यापाठोपाठ वित्तमंत्री अरुण जेटली, आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, कायदामंत्री रविशंकर प्रसाद, पोलादमंत्री चौधरी बिरेंदर सिंग, परराष्टÑमंत्री सुषमा स्वराज, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विवरणपत्र दाखल केले.अन्न प्रक्रियामंत्री हरसिमरत कौर बादल यांनी यावर्षाचे विवरणपत्र दिलेले नाही. २०१४-१५ मध्ये त्या ८७.४५ कोटींच्या संपत्तीसह सर्वांत श्रीमंत महिला मंत्री होत्या. महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी, अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, गृहमंत्री राजनाथसिंग, रसायने व खतेमंत्री अनंत कुमार यांनीही विवरणपत्र दिलेले नाही. २०१४-१५ आणि २०१५-१६ मध्ये सर्वच मंत्र्यांनी विवरणपत्र दिले होते. गृहमंत्रालयाच्या आचारसंहितेनुसार दरवर्षी ३१ आॅगस्टपूर्वी मंत्र्यांना आपले सांपत्तिक विवरणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. स्वत: बरोबरच पत्नी आणि अवलंबून असलेल्या मुलांच्या मालमत्तेचाही तपशील विवरणपत्रात द्यावा लागतो.कोणत्याही मंत्र्यांच्या संपत्तीत अवास्तव वाढ नाहीमाहिती सादर करणा-या कोणत्याही मंत्र्यांच्या संपत्तीत यंदा अवास्तव वाढ झालेली नाही. प्रकाश जावडेकर यांची संपत्ती ७.८६ कोटी रुपयांची आहे. तथापि, त्यांच्या पत्नीवर ३.०५ कोटींचे कर्ज आहे. मोदी यांच्या मुदत ठेवी ५१.२७ लाखांवरून ९०.२६ लाखांवर गेल्या आहेत. २०१६-१७ मध्ये त्यांनी पुस्तकांतून मिळणारे उत्पन्नच दाखविलेले नाही. आदल्या वर्षी त्यांना रॉयल्टीपोटी १२.३५ लाख रुपये मिळाले होते.यंदा त्यांनी हे उत्पन्न दान केले असावे, असे दिसते. त्याचा तपशील त्यांनी दिलेला नाही. त्यांचे उत्पन्न २८ लाखांनी वाढून २.०१ कोटी झाले. आदल्या वर्षी ते १.७३ कोटी होते. अरुण जेटली हे पुन्हा सर्वांत श्रीमंत मंत्री ठरलेआहेत. तथापि, मंत्री झाल्यापासून त्यांच्या संपत्तीत थोडी घट झाली आहे. रामविलास पासवान यांच्याकडे सर्वांत कमी संपत्ती आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीArun Jaitleyअरूण जेटलीGovernmentसरकार