शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

५३ वर्षांची आई मुलींसह झाली बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण; घरातील आनंद तिपटीने वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 08:11 IST

त्रिपुरातील शीला राणी दास यांचे खूप कमी वयात लग्न झाले. त्यानंतर काही वर्षांनी त्यांच्या पतीचे निधन झाले.

आगरतळा : आई व तिच्या दोन मुली एकाच वेळी त्रिपुरा माध्यमिक शिक्षण मंडळाच्या  परीक्षा उत्तीर्ण झाल्याची अनोखी घटना घडली आहे. या शिक्षण मंडळाने यंदाच्या १० वी व १२ वी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर केला. त्यात शीला राणी दास (५३ वर्षे) या १० वी व त्यांच्या दोन मुली १२ वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने त्यांच्या घरातील आनंद तिपटीने वाढला.

त्रिपुरातील शीला राणी दास यांचे खूप कमी वयात लग्न झाले. त्यानंतर काही वर्षांनी त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर घर चालविण्यासाठी व दोन मुलींचे पालनपोषण करताना त्यांना खूप मोठा संघर्ष करावा लागला. शीला यांना लहानपणापासून शिक्षणाची आवड होती. मात्र त्यांना अनेक कारणांनी शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. मुली मोठ्या झाल्या तसे त्यांनी आपल्या आईला आग्रह केला की, तू दहावीची परीक्षा दिलीच पाहिजे. शीला यांच्या मनातही ती इच्छा होतीच. मुलींबरोबर शीला राणी दास यादेखील परीक्षेचा अभ्यास करू लागल्या. अभ्यासात काही अडले की मुली आपल्या आईला तो मुद्दा नीट समजावून सांगत. 

शीला राणी दास यांनी सांगितले की, पन्नाशी उलटल्यानंतरही मी दहावीची परीक्षा देत असताना मुली किंवा ओळखीच्या लोकांनी मला प्रोत्साहनच दिले. त्यामुळेच मी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले. शीला या आगरतळा येथील अभयनगर स्मृती विद्यालयाच्या विद्यार्थिनी होत्या. 

मुलींनी अभ्यासात केली आईला मदतशीला राणी दास यांची मुलगी जयश्री यंदा १२ वीची परीक्षा उत्तीर्ण झाली. तिने आईच्या यशाबद्दल सांगितले की, आई १० वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली याचा आम्ही सर्वांनाच आनंद झाला आहे. तिला आम्ही अभ्यासात मदत केली. आईला मुळात शिक्षणाची आवड आहे. त्यामुळे तिने जिद्दीने ही परीक्षा देऊन त्यात यश मिळविले.