शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

५० हजार जीएसटी क्रमांक रडारवर; चार वर्षांत ५२ हजार कोटींच्या करचोरीचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 06:20 IST

आर्थिक वर्ष २०१७-१८ मधील फाइल्स उघडल्या. जीएसटी आणि कर चुकवेगिरी ॲनालिटिक्स विंगला माहिती अधिकार कायद्यातून सूट द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

- मनोज गडनीसलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जीएसटी विभागात आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर या प्रणालीतर्फे करचोरीचे काही अलर्ट्स मिळाले असून, आता मुंबईसह देशभरातील ५० हजार जीएसटी क्रमांकाची चौकशी सुरू होणार आहे. गेल्या चार वर्षांत ५२ हजार कोटी रुपयांची करचोरी झाल्याचा संशय विभागाला असून, त्या अनुषंगाने ही चौकशी करण्याचे निर्देश केंद्रीय उत्पादन व सेवा शुल्क विभागाने देशभरातील आपल्या कार्यालयांना दिले आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जीएसटी प्रणालींतर्गत भरले जाणारे विवरण, त्यातील त्रुटी, योग्य करभरणा झाला अथवा नाही, हे तपासण्यासाठी विभागाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्राचा वापर करत एक व्यवस्था उभी केली आहे. यानुसार, विभागाकडे भरणा होणारे परतावे आणि कर याची आकडेवारी, त्यातील विसंगती याचे नियमित अलर्ट्स  विभागाला मिळण्यास सुरुवात झाली आहे. यातूनच करचोरी झाल्याची माहिती विभागाला मिळाली आहे. 

निकषांचे पालन केले नाही...n आर्थिक वर्ष २०१७-१८ या वर्षात जीएसटी प्रणाली कार्यान्वित झाली. मात्र, त्यावर्षी केवळ नऊ महिन्यांचे जीएसटी विवरण भरले गेले. त्यामुळे त्या वर्षांपासून या चौकशीची सुरुवात होणार आहे. n या वर्षामध्ये ५० हजार जीएसटी क्रमांकांनी निकषांचे पालन न केल्याची माहिती विभागाला मिळाली असून, त्यांची चौकशी होईल. n आर्थिक वर्ष २०१९, २०२०, २०२१, २०२२ या वर्षातील विवरणांमधील विसंगतीची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून, त्याद्वारे ज्या जीएसटी क्रमांकाची माहिती मिळेल. त्यांची चौकशीदेखील याच वर्षी सुरू होणार असल्याचे समजते.

    चौकशीचे निकष काय?n ज्या कंपन्यांची वार्षिक उलाढाल मोठी आहे मात्र, लेखा परीक्षण झालेले नाही.n खर्च आणि उत्पन्न यात तफावत.n कराची थकबाकी.n विवरणातील विसंगती.n इनपुट टॅक्स क्रेडिटच्या नोंदीत विसंगती.

माहिती अधिकारातून वगळण्याची मागणीजीएसटी आणि कर चुकवेगिरी ॲनालिटिक्स विंगला माहिती अधिकार कायद्यातून सूट द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानेही गंभीर सायबर सुरक्षेचा संदर्भ देत अशीच सूट मागितली आहे. याबाबत सचिवांच्या समितीच्या बैठकीत तपशीलवार चर्चा करण्यात आली असून, याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही.

टॅग्स :GSTजीएसटी