शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देशामध्ये २0२४ पर्यंत सरकार उभारणार १00 नवी विमानतळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 03:50 IST

सध्या मोठे उद्योग व व्यवसाय मोठ्या शहरांत वा त्यांच्या आसपास केंद्रित होत आहेत. तिथे असलेल्या पायाभूत सुविधा हेच त्याचे कारण आहे.

नवी दिल्ली : भारताची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलर्सची करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. उद्योजक, व्यावसायिक यांना पायाभूत सुविधा देण्यासाठी आणि पर्यटनास चालना मिळावी म्हणून सरकारने येत्या पाच वर्षांत देशात १00 नवीन विमानतळे उभारण्याचे ठरविले आहे. याखेरीज देशातील १ हजार शहरांना विमान वाहतुकीने जोडण्यात येणार आहे.

सरकार जे १ हजार हवाई मार्ग सुरू करेल, ते बहुतांशी लहान शहरांना जोडणारे असतील. म्हणजेच लहान शहरांमध्येही विमानसेवा सुरू होईल. या विमानसेवांमुळे लहान शहरांमध्येही व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी गुंतवणूकदार तयार होतील, लहान शहरांत उद्योग, व्यवसाय आल्यास तिथे रोजगारनिर्मिती होईल आणि तेथील अर्थव्यवस्थेलाही गती मिळू शकेल. इतकी विमानतळे व नवे मार्ग सुरू करण्यासाठी विमानांची आणि वैमानिकांची संख्याही वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे २0२४ पर्यंत विमानांची संख्या दुप्पट करून, ती १२00 वर नेण्याचा आणि दरवर्षी ६00 तरुणांना वैमानिकाचे प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीत लहान व मध्यम आकाराच्या शहरांतील पायाभूत सुविधांवर तसेच इतर सर्व बाबींवर सविस्तर चर्चा झाली.

सध्या मोठे उद्योग व व्यवसाय मोठ्या शहरांत वा त्यांच्या आसपास केंद्रित होत आहेत. तिथे असलेल्या पायाभूत सुविधा हेच त्याचे कारण आहे. अशा सुविधा लहान व मध्यम आकाराच्या शहरांत देण्यावर बैठकीत एकमत झाले. याशिवाय देशातील कोणत्याही लहान वा मध्यम शहरात अखंड वीज व पाणीपुरवठा तसेच चांगले रस्ते आणि जवळ रेल्वे स्थानके या सुविधा देण्याची तयारी केंद्र सरकारने चालविली आहे.गुंतवणूकदारांची सोयग्रामीण भाग व लहान शहरांत स्वस्त रोजगार, कौशल्य उपलब्धता आणि उत्तम पायाभूत सुविधा यांद्वारे चीनशी स्पर्धा करणे शक्य आहे, असे सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लहान शहरांत जमिनींचे भाव, बांधकाम खर्चही तुलनेने कमी असतो. याचा फायदा गुंतवणूकदारांना मिळू शकतो, असे चीनच्या अनुभवातून दिसून आले आहे. चीनने पुढील १५ वर्षांत ४५0 व्यावसायिक विमानतळे उभारण्याचे ठरविले आहे. तितके इथे करणे लगेच शक्य नसले तरी त्यादृष्टीने तयारी सुरू केली जाणार आहे.

टॅग्स :Airportविमानतळ