शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

लांब पल्ल्याच्या 500 रेल्वे गाड्या होणार सुपरफास्ट, प्रवासी वेळेत दोन तासांची होणार कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2017 03:16 IST

पुढच्या महिन्यापासून देशात धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या आणखी सुपरफास्ट होणार आहेत. रेल्वे प्रशासनानं 500 रेल्वे गाड्यांना सुपरफास्ट एक्स्प्रेसचा दर्जा दिल्यानं त्यांचा वेग वाढणार आहे.

नवी दिल्ली- पुढच्या महिन्यापासून देशात धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या आणखी सुपरफास्ट होणार आहेत. रेल्वे प्रशासनानं 500 रेल्वे गाड्यांना सुपरफास्ट एक्स्प्रेसचा दर्जा दिल्यानं त्यांचा वेग वाढणार आहे. रेल्वे मंत्रालयाने याची आज घोषणा केली आहे. 500 रेल्वे गाड्यांना सुपरफास्ट एक्स्प्रेसचा दर्जा दिल्यानं या ट्रेनच्या प्रवासी वेळेत दोन तासांनी कपात होणार आहे.पुढच्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरपासून या सुपरफास्ट एक्स्प्रेसचे वेळपत्रक जाहीर केले जाणार आहे. उशिरानं धावणा-या रेल्वे व वाढत्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानं रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर अधिकाधिक लक्ष्य केंद्रित करण्याचं ठरवलं आहे. रेल्वे प्रशासनानं ट्रेनचा सर्वाधिक वापर करण्याचा दृष्टिकोन ठेवला असून, त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तसेच पुन्हा परतीच्या प्रवासाला निघणा-या या सुपरफास्ट दर्जाच्या एक्स्प्रेस कोणत्याही स्टेशनवर थांबवणार असल्यास त्या ट्रेनला 'लाय ओव्हर पीरियड'मध्ये थांबवण्याचा रेल्वे प्रशासनाच्या विचाराधीन आहे. नव्या वेळापत्रकानुसार सुरुवातीला 50 रेल्वे गाड्या अशा प्रकारे धावणार आहेत.रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मंत्रालयाला याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार आता प्रवाशांच्या सोयीसाठी या रेल्वे गाड्यांच्या प्रवासी वेळेत 5 मिनिटांपासून 2 तासांपर्यंत कपात करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने अंतर्गत ऑडिट सुरू केले असून, याद्वारे 50 मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांना सुपरफास्टचा दर्जा देण्यात येणार आहे. रेल्वेच्या ताफ्यातील सध्याच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या सरासरी वेगामध्ये वाढ करण्यात येणार आहे. तसेच या गाड्यांचा स्टेशनात थांबण्याची वेळही कमी करण्यात येणार आहे. तसेच ज्या स्थानकांत कमी प्लॅटफॉर्म आहेत, अशा स्टेशनमध्ये या गाड्या थांबवण्यात येणार नाहीत. रेल्वेतील या नव्या सुधारणांसाठी रेल्वे ट्रॅक आणि पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्या गाड्या 130 किमी प्रतितास या वेगाने धावतात. त्यांच्यासाठी स्वयंचलित सिग्नल यंत्रणा आणि नव्या बुश कोचची व्यवस्था करण्यात येणार आहे.

अंतर्गत आॅडिट सुरू

रेल्वेगाड्यांचे अंतर्गत आॅडिट केले जात आहे. त्याद्वारे ५० मेल व एक्स्प्रेस गाड्यांना आवश्यक सुधारणा करून सुपर-फास्ट गाड्यांमध्ये परिवर्तित केले जाईल. गाड्यांचा सरासरी वेग वाढविण्याची ही प्रक्रिया आहे. रेल्वे रुळ व पायाभूत बाबींचा विकास, आॅटोमॅटिक सिग्नलिंग व १३० किलोमीटर प्रति तास वेगाने धावू शकणारे आधुनिक डबे यामुळे रेल्वेगाड्यांचा वेग वाढणे अपेक्षित आहे. आता वेगावरील बंधनावरही पुनर्विचार केला जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

या गाड्या लवकर पोहोचतीलभोपाळ-जोधपूर एक्स्प्रेस ९५ मिनिटे आधी पोहोचेल तर, गुवाहाटी-इंदोर स्पेशल ट्रेन २३३० किलोमीटरचा प्रवास ११५ मिनिटांपूर्वी पूर्ण करेल. तसेच, गाझीपूर-बांद्रा टर्मिनन्स एक्स्प्रेस १९२९ किलोमीटरचे अंतर ९५ मिनिटे आधी कापेल. गाड्या वेगवान करण्यासाठी रेल्वेस्थानकावर गाडी थांबविण्याच्या वेळेत कपात करण्यात येईल. तसेच, प्रवाशांची संख्या कमी असलेल्या रेल्वेस्थानकांवर गाडी उभी केली जाणार नाही.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीpiyush goyalपीयुष गोयल