शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

शिवशाही पुनर्वसनसाठी ५०० कोटी

By admin | Updated: August 12, 2015 23:53 IST

शिवशाही पुनर्वसनासाठी ५०० कोटी

शिवशाही पुनर्वसनासाठी ५०० कोटी
मुंबई - मुंबई महानगर क्षेत्रात सर्वसामान्यांना परवडणारी घरे बांधण्यासाठी झोपडप˜ी पुनर्वसन प्राधिकरणाच्या निधीतून ५०० कोटी रु पये शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाला देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.
मुंबई शहरातील झोपडपट्टी समुहाची (क्लस्टर) व योजनांच्या बाहेरील हद्दीची मोजणी ईटीएस/जीपीएस या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुढाकार घेणार आहे. ही प्रक्रि या जलद करण्यासाठी खासगी संस्थेची मदत घेतली जाणार आहे. त्याद्वारे विकास नियोजन आराखड्याच्या व नगरभूमापनाच्या हद्दीसह अद्ययावत जीआयएस मॅप तयार करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितले.(विशेष प्रतिनिधी)
--------------------------------------------------
झोपू योजनेत सुलभता
झोपडीधारकांची पात्रता निश्चितीची प्रक्रि या आता सुलभ व जलद करण्यात येणार आहे. तसेच पात्र असलेल्या व बैठकीस उपस्थित झोपडीधारकांपैकी ७० टक्के; परंतु एकूण पात्र झोपडीधारकांच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी नाही या तत्त्वावर गुप्त मतदानाद्वारे विकासकाची नेमणूक करण्यात येणार आहे.
यापूर्वी विकासकाची नेमणूक ही विकास नियंत्रण नियमावलीनुसार ७० टक्के झोपडीधारकांच्या संमतीने होत होती. मात्र, या संमती मिळण्याच्या प्रक्रि येस विलंब होऊन प्रकल्प रखडत होता. आता या प्रक्रि येत सुधारणा केल्यामुळे पुनर्वसन प्रकल्प जलद पूर्ण होण्यास मदत होणार आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
--------------------------------------------------
खासगी मालकांना संधी
झोपडप˜ी असलेल्या खासगी जमिनीच्या मालकांना प्राधान्याने तीन महिन्यांच्या कालावधीत पुनर्वसन योजना दाखल करण्याची संधी देण्यात येणार आहे. वेळेत योजना दाखल न केल्यास या जमिनीचे नियमानुसार संपादन करण्यात येईल. तसेच शासकीय व निमशासकीय जमिनींवरील झोपडीधारकांना पुनर्वसन योजना सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली जाणार असून ती त्यांनी मुदतीत सादर न केल्यास प्राधिकरणामार्फत निविदेद्वारे विकासकाची नेमणूक करु न ही योजना राबविली जाईल.
--------------------------------------------------
...तर वास्तव्य करणार्‍यास सदनिका
सर्व झोपडधारकांची पात्रता निश्चित करण्याच्या दृष्टीने प्राधिकरणाने आपल्या पातळीवर जीआयएस सक्षम बायोमेट्रिक सर्वेक्षणाद्वारे माहिती संकलित करावी असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, जुलै २०१५ पूर्वी झालेल्या सदनिकांचे अनधिकृत हस्तांतरण झाले असल्यास प्रत्यक्ष वास्तव्य करणार्‍या व्यक्तींना सदनिकांचे पुनर्वाटप करण्याचे धोरण ठरविण्यात येईल. त्यानुसार पूर्वीचा मालक शासनाच्या योजनेतील नवीन घरासाठी अपात्र ठरविणार आहे.
--------------------------------------------------