शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बिहार पूरग्रस्तांसाठी ५00 कोटींची मदत जाहीर,  नरेंद्र मोदींनी नितीश कुमारांसह केली पूरस्थितीची हवाई पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 05:28 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारातील पूरस्थितीची शनिवारी हवाई पाहणी केली, तसेच पूरग्रस्त भागाला ५00 कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली.

एस. पी. सिन्हा।पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारातील पूरस्थितीची शनिवारी हवाई पाहणी केली, तसेच पूरग्रस्त भागाला ५00 कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली. पुरात मरण पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांसाठी २ लाख रुपयांचे, तर गंभीर जखमींना ५0 हजारांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणाही त्यांनी केली.पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक बिहारला पाठविण्यात येईल, असे पंतप्रधानांनी सांगितले. त्याचप्रमाणे शेतकºयांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी यासाठी विमा कंपन्यांनी लवकरात लवकर प्रतिनिधी पाठवून नुकसानीचा आढावा घ्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केल्यानंतर पंतप्रधानांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासोबत एक बैठक घेतली. उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी आणि राज्याचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर वरील आदेश पंतप्रधानांनी जारी केले. चुनापूर विमानतळावर झालेल्या या बैठकीनंतर पंतप्रधान दिल्लीला परतले.पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बिहार सरकारला आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.मोदी यांनी बिहारातील चार जिल्ह्यांतील पूरस्थितीची हवाई पाहणी केली. त्यात पुर्णिया, कटिहार, किशनगंज, अरारिया यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी हेही त्यांच्यासोबत होते.पंतप्रधानांना देण्यात आलेल्या माहितीनुसार, बिहारातील १९ जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला आहे. त्यातील १३ जिल्ह्यांत नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. राज्याच्या जलस्रोत विभागाला सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले आहे. नद्यांच्या काठांवर उभारण्यात आलेले कोट आणि सिंचन कालवे वाहून गेले आहेत. त्यांची पुनर्बांधणी करण्यासाठी २,७00 कोटी रुपये लागतील.पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी सरकारी यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. आतापर्यंत २ हजार कोटी रुपयांचे मदत साहित्य पूरग्रस्तांना वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली.केंद्रामार्फतरस्त्यांची दुरुस्तीमोदी यांनी सांगितले की, बिहारातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्रालय योग्य ती कार्यवाही करील.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी