५० हजारासाठी विवाहितेचा छळ
By admin | Updated: July 6, 2015 23:34 IST
लातूर : माहेरहून ५० हजार रुपये घेऊन ये म्हणून देवणी तालुक्यातील बोरुळ येथील विवाहितेचा छळ होत असल्याची तक्रार देवणी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे़ पोलिसांनी सांगितले, देवणी तालुक्यातील बोरुळ येथील भाग्यश्री उर्फ सोनी राजकुमार यनकुरे (२३) या विवाहितेस लग्नाच्या एक वर्षानंतर ते आजपावेतो पती राजकुमार अशोक यनकुरे व सासरच्या मंडळींनी पैशासाठी छळ केल्याची तक्रार आहे़ माहेरहून ५० हजार रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेला उपाशीपोटी ठेवून शिवीगाळ व मारहाण केली़ तसेच शारीरिक व मानसिक छळ केला, असे फिर्यादीत नमुद आहे़ याबाबत राजकुमार यनकुरे व सोबतच्या एकाविरुद्ध देवणी पोलिस ठाण्यात गुरनं ६३/१५ कलम ४९८ अ, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल झाला आहे़ पुढील नापोका गोलंदाज करीत आहेत़
५० हजारासाठी विवाहितेचा छळ
लातूर : माहेरहून ५० हजार रुपये घेऊन ये म्हणून देवणी तालुक्यातील बोरुळ येथील विवाहितेचा छळ होत असल्याची तक्रार देवणी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे़ पोलिसांनी सांगितले, देवणी तालुक्यातील बोरुळ येथील भाग्यश्री उर्फ सोनी राजकुमार यनकुरे (२३) या विवाहितेस लग्नाच्या एक वर्षानंतर ते आजपावेतो पती राजकुमार अशोक यनकुरे व सासरच्या मंडळींनी पैशासाठी छळ केल्याची तक्रार आहे़ माहेरहून ५० हजार रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेला उपाशीपोटी ठेवून शिवीगाळ व मारहाण केली़ तसेच शारीरिक व मानसिक छळ केला, असे फिर्यादीत नमुद आहे़ याबाबत राजकुमार यनकुरे व सोबतच्या एकाविरुद्ध देवणी पोलिस ठाण्यात गुरनं ६३/१५ कलम ४९८ अ, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल झाला आहे़ पुढील नापोका गोलंदाज करीत आहेत़ पेरणीच्या कारणावरुन मारहाण लातूर : उदगीर तालुक्यातील कोदळी येथील शिवारात पेरणीच्या कारणावरुन तिघांनी एकास मारहाण केल्याची तक्रार वाढवणा पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे़ पोलिसांनी सांगितले, कोदळी येथील जनार्दन तुळशीराम जाधव (वय ५७) हे त्यांचे भाऊ ज्ञानोबा तुळशीराम जाधव यांच्या नावे असलेल्या गट नं़ १८८ मध्ये ट्रॅक्टरने पेरणीचे काम करीत असताना, ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता कोदळी येथील पांडुरंग राजाराम हिरामणे व सोबतच्या तिघांनी जमिनीवर अनाधिकृत प्रवेश केला़ पेरणीचे काम अडवून बंद करीत जनार्दन जाधव यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करीत जिवे मारण्याची धमकी दिली़ याबाबत दिलेल्या फिर्यादीवरुन वाढवणा पोलिस ठाण्यात पांडुरंग हिरामणे व सोबतच्या तिघाविरुद्ध गुरनं ४५/१५ कलम ३४१, ४४७, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंविनुसार गुन्हा नोंद झाला आहे़