शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या ‘बेटी बचाओ’ योजनेचा ५0 टक्के खर्च केवळ प्रसिद्धीवरच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 04:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ' या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी जितक्या रकमेची तरतूद केली होती त्यापैकी ५६ टक्के रक्कम प्रत्यक्षात केवळ आणि केवळ प्रसिद्धीसाठीच खर्च करण्यात आली,

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ' या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी जितक्या रकमेची तरतूद केली होती त्यापैकी ५६ टक्के रक्कम प्रत्यक्षात केवळ आणि केवळ प्रसिद्धीसाठीच खर्च करण्यात आली, असे उघडकीस आले आहे. देशात दिवसेंदिवस घटत चाललेल्या महिलांच्या जन्मदरात वाढ व्हावी, मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जावे आणि महिलाविषयीचा समाजाचा दृष्टीकोन बदलावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही योजना २२ जानेवारी २0१५ रोजी जाहीर केली होती. महिला आणि बाल कल्याण, आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच मनुष्यबळ विकास या तीन मंत्रालयांकडून ही योजना देशभरात राबवली जात आहे.'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ' योजनेसाठी केंद्र सरकारने ६४४ कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यापैकी फक्त १५९ कोटी रुपये राज्यांना व काही जिल्ह्यांना पाठवण्यात आले. ही योजना देशातील ६४0 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात देशात मुलींचा जन्मदर अतिशय कमी असलेल्या १00 जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती. तर योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी ६१ जिल्ह्यांना सामावून घेण्यात आले, असे सरकारने म्हटले आहे. >१९ टक्के रक्कम खर्च केलीच नाहीअत्यंत गाजावाजा करून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ही योजना सुरु करताना यासाठी केंद्र सरकारने तरतूद केलेल्या निधीपैकी केवळ २५ टक्के रक्कमच विविध राज्ये आणि निवडलेल्या जिल्ह्यांच्या पातळीवर पाठवण्यात आली आहे. यातील १९ टक्के रक्कम तर खर्चच केली नाही, अशी माहिती महिला आणि बालविकास राज्यमंत्री डॉ. विरेंद्र कुमार यांनीच दिली आहे.