शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सेमीकंडक्टर्स फॅब्जसाठी ५०% देणार अर्थसहाय्य, केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 10:21 IST

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशातील सेमीकंडक्टर्स व डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राच्या विकासासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला. देशात सेमीकंडक्टर फॅब्जच्या सुरू करण्याच्या योजनेच्या अंतर्गत प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के अर्थसहाय्य संबंधितांना देण्याचे या निर्णयाद्वारे ठरविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक झाली. 

कम्पाऊंड सेमीकंडक्टर्स, प्रगत पॅकेजिंगचे विशिष्ट तंत्रज्ञान व स्वरूप लक्षात घेता कम्पाऊंड सेमीकंडक्टर्स, सिलिकॉन फोटोनिर्स, सेन्सर्स, डिस्क्रीट सेमीकंडक्टर फॅब्ज, एटीएमएमपी आदींकरिता प्रकल्प उभारणीसाठी लागणाऱ्या भांडवली खर्चाच्या ५० टक्के अर्थसहाय्य केंद्राकडून दिले जाईल. या योजनेमुळे विदेशी गुंतवणूकदारांनी भारतात सेमीकंडक्टर फॅक्टरीज सुरू करण्याच्या प्रक्रियेला चालना मिळणार आहे. देशातील सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राच्या विकासासाठी उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञांचा समावेश असलेली सल्लागार समिती केंद्र सरकारने स्थापन केली. या समितीच्या  शिफारसी केंद्राने स्वीकारल्या आहेत. 

राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरणाला मंजुरीराष्ट्रीय लॉजिस्टिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. वाहतुकीवरील खर्च कमी करणे, या क्षेत्राची जागतिक स्तरावरील कामगिरी सुधारणे हा या धोरणाचा उद्देश आहे. राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या (जीडीपी) १३ ते १४ टक्के असलेला वाहतूक खर्च ७.५ टक्क्यांपर्यंत कमी आणण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. 

सोलार पीव्ही मॉड्युल्सबाबत प्रोत्साहनपर योजनासोलार पीव्ही मॉड्युल्समध्ये गिगा वॅट क्षमतेची कार्यक्षमता प्राप्त करण्यासाठी केंद्र सरकारने १९५०० कोटी खर्चाची एक योजना तयार केली आहे. उच्च कार्यक्षमतेचे सोलार पीव्ही मॉड्युल्स या योजनेसंदर्भात उत्पादनाशी निगडित प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरात