दूध संघास ५० कोटी एकनाथराव खडसे : नूतनीकरणासाठीही ५० कोटी पुढील वर्षी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2016 23:16 IST
जळगाव : जिल्हा दूध संघाची जुनी झालेली यंत्रसामुग्री बदलून आधुनिक यंत्रसामुग्री बसविण्यासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत ५० कोटींची कर्ज मंजूर झाले असून त्यात ५० टक्के अनुदान उपलब्ध होणार आहे. मंजूर कर्जाची रकम येत्या १५ दिवसात संघास प्राप्त होणार असल्याची माहिती महसूल तथा पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली.
दूध संघास ५० कोटी एकनाथराव खडसे : नूतनीकरणासाठीही ५० कोटी पुढील वर्षी
जळगाव : जिल्हा दूध संघाची जुनी झालेली यंत्रसामुग्री बदलून आधुनिक यंत्रसामुग्री बसविण्यासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत ५० कोटींची कर्ज मंजूर झाले असून त्यात ५० टक्के अनुदान उपलब्ध होणार आहे. मंजूर कर्जाची रकम येत्या १५ दिवसात संघास प्राप्त होणार असल्याची माहिती महसूल तथा पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली. जिल्हा दूध संघाच्या ५५० मे.टन क्षमतेच्या बटर डिप फ्रिज गोडाऊन व सॉलिड फ्युएल बॉईलरचा उद्घाटन सोहळा प्रजासत्ताकदिनी एकनाथराव खडसे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चेअरमन मंदाताई खडसे होत्या. कार्यकारी संचालक मनोज लिमये यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी लिमये यांनी १९९५ अगोदर व नंतर संघाच्या स्थितीची माहिती प्रास्ताविकात दिली. युती सरकाची मदतआपल्या प्रमुख भाषणात बोलताना खडसे म्हणाले, युती सरकाच्या काळात बंद पडण्याच्या मार्गावर असलेला संघ एनडीडीबीचे अध्यक्ष डॉ. वर्गीस कुरियन यांची भेट देऊन त्यांच्या ताब्यात दिला. आपण केलेल्या मदतीने त्यावेळी संघ डबघाईतून बाहेर पडला. संघाची दूध विक्री वाढविण्यासाठी मुंबई, डोंबिवली, कल्याण, नाशिक व औरंगाबाद येथील आरे बुथवर विकासचे दूध विकण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. राज्य दूध संघानेही संघाचे दूध स्वीकारावे असे आवाहन त्यांना केले जाणार आहे. तसेच इतर दूध संघांना दिल्या जाणार्या दूध खरेदी दराप्रमाणे संघास दर दिले जावे असे आदेशही देण्यात आले आहेत. ५० कोटी कर्ज मंजूरशासनाच्या राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत संघास रूपये ५० कोटी मंजूर असून त्यावर ५० टक्के अनुदान उपलब्ध होणार आहे. मंजूर कर्जाची रकम संघास येत्या १५ दिवसात मिळेल असेही त्यांनी सांगितले. ----