शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

‘आयुष्यमान भारत’साठी हवेत ५ लाख डॉक्टर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 06:54 IST

गरिबांना मोफत वैद्यकीय सुविधा देण्याची ‘आयुष्यमान भारत’ योजना तडीस नेण्यासाठी देशाला ५ लाख डॉक्टरांची गरज आहे. त्यासाठी प्रसंगी विदेशात राहणाऱ्या भारतीय डॉक्टरांना पाचारण केले जाईल

मुंबई : गरिबांना मोफत वैद्यकीय सुविधा देण्याची ‘आयुष्यमान भारत’ योजना तडीस नेण्यासाठी देशाला ५ लाख डॉक्टरांची गरज आहे. त्यासाठी प्रसंगी विदेशात राहणाऱ्या भारतीय डॉक्टरांना पाचारण केले जाईल, असे निती आयोगाचे सदस्य डॉ. विनोद पॉल यांनी येथे सांगितले.डॉ. पॉल यांनी शनिवारी मुंबईत भारतीय उद्योग महासंघातर्फे (सीआयआय) आयोजित कार्यक्रमात वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केली. विकसित देशांमध्ये प्रति लाख स्पेशालिस्ट डॉक्टरांची संख्या ५० आहे. भारतात हा आकडा फक्त ५.३ आहे. ‘आयुष्यमान भारत’समोर हेच सर्वात मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.देशातील आजवरच्या सर्व सरकारी वैद्यकीय विमा योजना काही ना काही कारणाने अयशस्वी ठरल्या. त्या उद्दिष्ट पूर्णच करू शकल्या नाहीत. आता मात्र आयुष्यमान योजनेत ४० टक्के गरिबांना सामावून घेतले जाईल, असे ते म्हणाले.उपचारांची १३00 पॅकेजेसया योजनेतील वैद्यकीय उपचारांची १३०० पॅकेजेस केंद्राने तयार केली आहेत. उपचारांसाठीचे दरही निश्चित आहेत. देशभर एकच दर ठेवण्याचा विचार सुरू आहे.योजनेसाठी छोट्या शहरांमधील इस्पितळांची गरज आहे. मोठी इस्पितळेही लागतीलच. पण वैद्यकीय क्षेत्राने दरवेळेस केवळ नफेखोरीचा विचार करू नये, असे आवाहन डॉ. पॉल यांनी केले.लवकरच निविदाया योजनेत वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित सर्वांनीच सहभागी होणे आवश्यक आहे. याची निविदा लवकरच काढली जाईल. योजना राज्यांनी राबवायची आहे. त्यामुळे राज्यांना गरज भासल्यास केंद्राच्या धर्तीवरच स्वतंत्र निविदा त्यांना काढता येईल, असे डॉ. पॉल यांनी ‘लोकमत’ला सांगितले.या योजनेतील लाभार्थींना वेगळी नोंदणी करावी लागणार नाही. कुठल्या क्षेत्रातील कोणाचा योजनेत समावेश असेल, याची यादी केंद्राने तयार केली आहे. देशात अशी १० कोटी ७४ लाख कुटुंबे आहेत, असे डॉ. पॉल म्हणाले.