शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून हॉटेलवरील जेवणावर ५ टक्केच जीएसटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 02:56 IST

हॉटेलातील जेवणावर बुधवारी, १५ नोव्हेंबरपासून ५ टक्केच जीएसटी आकारण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली होती.

मुंबई : हॉटेलातील जेवणावर बुधवारी, १५ नोव्हेंबरपासून ५ टक्केच जीएसटी आकारण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली होती. त्यानंतर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी या निर्णयाची अंमलबजावणी न करणा-या हॉटेल चालकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र या घोषणेची मंगळवारी रात्री उशिरापर्यंत अधिसूचनाच जारी न झाल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. अखेर ग्राहकांच्या हितासाठी अधिसूचनेविनाच बुधवारपासून ५ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय हॉटेल चालकांनी घेतला आहे.घोषणा करणा-या सरकारने राज्यात अधिसूचनाच जारी केली नसल्याने राज्यातील हॉटेल व्यवसायिकांची कोंडी झाली होती. हॉटेल व्यवसायिकांच्या आहार संघटनेचे अध्यक्ष आदर्श शेट्टी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ५ टक्के जीएसटी आकारण्याची संपूर्ण तयारी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे. केवळ तांत्रिक कारणास्तव ग्राहकांचे नुकसान होऊ नये, म्हणून सर्व हॉटेल व्यवसायिकांनी १२ व १८ टक्क्यांऐवजी ५ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :hotelहॉटेलGSTजीएसटी