शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

अलर्ट! 'या' पाच फेक CoWin Vaccine अॅपपासून सावधान, नाहीतर होईल पश्चाताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 19:09 IST

देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढलेला असताना या भयानक संकटावर मात देण्यासाठी लसीकरण मोहीम देखील वेगानं करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढलेला असताना या भयानक संकटावर मात देण्यासाठी लसीकरण मोहीम देखील वेगानं करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. लसीकरणचं बुकिंग करण्यासाठी केंद्र सरकारनं को-विन (CoWin ) रजिस्ट्रेशन अॅप सुरू केलं आहे. पण अॅपमध्ये स्लॉट रजिस्टर करण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. लसींची उपलब्धता मर्यादित असल्यानं लसीकरणासाठीचे स्लॉट अवघ्या काही मिनिटांत बूक केले जात आहेत. त्यामुळे तातडीनं स्लॉट बूक करण्यासाठी इंटरनेटवर वेगवेगळे पर्याय आजमवले जात आहेत आणि इथंच इंटरनेट हॅकर्स आपलं जाळं टाकतात. त्यामुळे केंद्र सरकारनं फेक को-विन अॅप्सपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. 

भारतीय कॉम्प्यूटर इमरजंसी रिस्पॉन्स टीम (CERT-In) नं नागरिकांना फेक CoWin लस रजिस्ट्रेशन अॅपबद्दल सावध करण्यासाठी एक परिपत्रक जारी केलं आहे. लसीकरणासाठी स्लॉट बूक करण्यासाठी सध्या सुरू असलेल्या घाईगडबडीचा नेटिझन्स फायदा घेत आहेत. 

हॅकर्स एक फेक मेसेज युझरच्या मोबाइलवर पाठवतात आणि फेक अॅप डाऊनलोड करण्यासाठी लिंक पाठवतात. मोबाइल SMS च्या माध्यमातून फेक मेसेजेस सध्या व्हायरल केले जात आहेत. फेक SMS मध्ये युझरला पाच फेक अॅप डाऊनलोड करण्यासाठीची गळ घातली जाते. 

को-विन रजिस्ट्रेशनसाठी फेक अॅप APK फाइल्सची यादी

  • Covid-19.apk
  • Vaci__Regis.apk
  • MyVaccin_v2.apk
  • Cov-Regis.apk
  • Vccin-Apply.apk

 

मोबाइल SMS मध्ये एक लिंक दिली जाते. या लिंकवर क्लिक करुन वरील फेक अॅप्स डाऊनलोड केले गेले तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं. फेक अॅपच्या एपीके डाऊनलोड झाल्यानं तुमचं किती नुकसान होऊ शकतं याचा अंदाज या गोष्टीवरुन लावता येईल की फेक अॅपच्या SMS मधील लिंकवर क्लिक केल्यानंतर अगदी तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टपर्यंत याचा प्रभाव होतो. संबंधित अॅपला अवैधरित्या सर्व परवानग्या मिळून जातात आणि याच्याच माध्यमातून हॅकर्स तुमची संपूर्ण माहिती मिळवतो. 

Cowin किंवा Aarogya Setu वरुनच करा रजिस्ट्रेशनदेशात संपूर्ण लसीकरण प्रक्रिया डिजिटल पद्धतीनंच हाताळली जात आहे. यात लसीकरणासाठी सर्व नागरिकांना केवळ CoWin वेबसाइट (cowin.gov.in) किंवा आरोग्य सेतू (Aarogya Setu) अॅप यांचाच वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, Paytm आणि Healthifyme यांच्यासारखे काही थर्ड पार्टी वॅक्सीन ट्रॅकर अॅप्स देखील आहेत. पण यातून तुम्हाला केवळ लसींच्या उपलब्धतेची माहिती दिली जाते. यात तुम्ही लसीसाठी रजिस्ट्रेशन करू शकत नाही.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या