शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

देशात ५.६ कोटी नागरिक गरिबीच्या खाईत; कोरोना काळात बसला सर्वाधिक फटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 09:26 IST

ग्रामीण भागातील गरिबीत घट; जागतिक बँकेचा अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना साथीच्या महामारीमुळे २०२० मध्ये सर्व उद्योगधंदे बंद झाल्याने कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. यामुळे भारतातील तब्बल ५.६ कोटी नागरिक गरिबीच्या खाईत ओढले गेले, असे जागतिक बँकेने आपल्या नव्या अहवालात म्हटले आहे. 

थिंक टँक सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने केलेल्या सर्वेक्षणातील आकडेवारीचा हवाला जागतिक बँकेने यासाठी दिला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष अद्याप निश्चित झालेले नाहीत; परंतु जागतिक बँकेने ‘गरिबी आणि सर्वांची समृद्धी २०२२’ या शीर्षकाच्या अहवालात जगातील गरिबीचा अंदाज घेण्यासाठी या आकडेवारीचा वापर केला आहे. भारत गेल्या काही वर्षांत जागतिक आणि प्रादेशिक गरिबीच्या अंदाजांमधील अंतर भरण्यासाठी आवश्यक असणारा डेटा प्रकाशित करीत नसल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये सादर केलेल्या अंदाजापेक्षा भारतात गरिबीचे प्रमाण अधिक आहे. ‘आयएमएफ’ने २०२०मध्ये २.३ कोटी भारतीय गरिबीत गेल्याचे म्हटले होते. राष्ट्रीय खात्यांवर आधारित असलेला आयएमएफचा अहवाल अर्थशास्त्रज्ञ सुरजित भल्ला, करण भसीन आणि अरविंद विरमानी यांनी लिहिला आहे. २०१८मध्ये पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा देणारे भल्ला सध्या ‘आयएमएफ’मध्ये भारतासाठी कार्यकारी संचालक आहेत.

सध्या किती भारतीय गरीब? 

यापूर्वीच्या जागतिक बँकेच्या आधीच्या अंदाजानुसार २०१७ मध्ये भारतातील एकूण लोकसंख्येपैकी १०.४ टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली होती. त्यांचा प्रतिदिन पगार केवळ १५५ रुपये (१.९ डॉलर) होता. ताज्या अहवालानुसार, २०१७ मध्ये देशातील १३.६ कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली म्हणजे गरिबीत जीवन जगत होते.

किती वाढला गरिबीचा दर? 

कोरोना साथीच्या रोगाने जगात अत्यंत गरिबीचा दर २०२० मध्ये अंदाजे ९.३ टक्क्यांपर्यंत वाढविला, जो २०१९ मध्ये ८.४ टक्के होता. २०११ पासून भारतात विशेषतः ग्रामीण भागात गरिबीत घट झाल्याचेही अहवालात म्हटले आहे.

शहरात, गावाकडे किती गरिबी? 

सन २०१९-२०मध्ये भारतातील १० टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली जगत होती, असे जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले आहे. ग्रामीण भागात १२ टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली राहतात, तर ६ टक्के शहरी लोक गरिबीत जीवन जगत होते.

सरकार कुठे कमी पडले? 

सरकारला गरजूंपर्यंत पोहोचणे कठीण झाले असल्याने कोरोना महामारीमुळे गरिबांची स्थिती आणखी बिकट झाली असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. केंद्र सरकार कोरोना महामारीच्या काळात १५% ग्रामीण जनतेपर्यंत, तर ३१% जनतेपर्यंत पोहोचण्यास अपयशी ठरले, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.

सर्वाधिक गरीब कोण? 

आफ्रिकन देश (सर्वांत गरीब) दक्षिण आशिया : भारत, पाकिस्तान, बांगलादेश ब्राझील । इंडोनेशिया

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार