शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

६ वर्षांत विजेच्या धक्क्याने ४७४ हत्तींचा मृत्यू; प्राण्यांची अन्नासाठी मानवी वस्त्यांकडे धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 08:45 IST

२०१४ ते २०२० चा कालावधी; प्राण्यांची अन्नासाठी मानवी वस्त्यांकडे धाव

कोची : २०१४ ते २०२० या कालावधीत ४७४ हत्ती विजेच्या धक्क्याने मरण पावले. अशा सर्वाधिक घटना आसाममध्ये घडल्या आहेत. त्यानंतर ओडिशा, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ या राज्यांचा क्रमांक लागतो. मानव व वन्यप्राणी यांच्यातील वाढता संघर्ष, जंगलांवर माणसाने केलेले आक्रमण यांसारख्या कारणांमुळे इतर प्राण्यांप्रमाणेच रानटी हत्तींचे अन्नासाठी मानवी वस्त्यांकडे पाय वळत आहेत. त्यांना अटकाव करण्यासाठी वीजप्रवाह सुरू असलेल्या तारांचे कुंपण शेती, मळ्याला घातले जाते. तिथे विजेचा झटका लागून हत्ती मरण पावण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. 

जगातील आशियाई हत्तींपैकी निम्मे म्हणजे २७,३०० हत्ती एकट्या भारतामध्ये आहेत. विजेचा धक्का लागून मरण पावणाऱ्या हत्तींबाबत माहितीच्या अधिकाराखाली विचारण्यात आलेल्या प्रश्नाला केंद्रीय वन व पर्यावरण खात्याने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, पूर्वी हत्तींची शिकार मोठ्या प्रमाणावर केली जायची. पण आता विजेच्या तारांच्या धक्क्याने हत्ती मरण पावण्याचे प्रमाण वाढले आहे. 

केंद्रीय वने व पर्यावरण खात्याने म्हटले आहे की, २०१४ ते २०२० या कालावधीत ४७४ हत्ती विजेच्या धक्क्याने मरण पावले. अशा सर्वाधिक घटना आसाममध्ये घडल्या आहेत. तिथे ९० हत्ती मरण पावले. त्यानंतर ओडिशामध्ये ७३, तामिळनाडूमध्ये ६८, कर्नाटकमध्ये ६५, केरळात २४ हत्तींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.  गेल्या काही वर्षांत माणूस व प्राणी यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. त्यातच ग्लोबल वॉर्मिंगसारख्या घटकांचीही भर पडली आहे. केंद्र सरकारने वनव्यवस्थापन धोरणाचा फेरआढावा घ्यावा, अशी मागणी वन्यजीवप्रेमींकडून करण्यात येत आहे.  (वृत्तसंस्था)

संघर्ष आणखी तीव्र होणार

आशियाई हत्ती या विषयाचे तज्ज्ञ डॉ. पी. एस. इसा म्हणाले की, जंगलांवर माणसाने आक्रमण केले आहे. ज्या ठिकाणी जंगलात पुरेसे अन्न मिळत नाही, तिथे हत्ती अन्नासाठी मानवी वस्त्यांकडे आपला मोहरा वळवितात. माणूस व वन्यप्राण्यांमधील  संघर्ष भविष्यात आणखी तीव्र होण्याची लक्षणे आहेत.

टॅग्स :Keralaकेरळ