ऑनलाइन टीम
सोमवार, दि. २६ - मोदींच्या मंत्री मंडळात एकुण ४५ खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली असून, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधीत मंत्र्यांना मिळणा-या खात्यांची वर्तवलेली शक्यता पुढील प्रमाणे. मोदींनंतर राजनाथ सिंह, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्यासह इतर २४ कॅबिनेट, ११ राज्य मंत्री आणि १० स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्र्यांनीही शपथ घेतली असून भाजप कडून खातेवाटप करण्यात आली नाही. सुत्रांनी वर्तवलेल्या शक्यतेनुसार कॅबिनेट मंत्री पदासाठी राजनाथ सिंह यांची गृह मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता असून अरुण जोटली यांना अर्थ आणि संरक्षण मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. तसेच सुषमा स्वराज यांना परराष्ट्र मंत्रीपद तर, माजी लष्कर प्रमुख व्हि.के सिंग यांना परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव पदी नेमले जाण्याची शक्यता आहे. नितीन गडकरी यांना दळण वळण व जाहाज बांधणी मंत्रीपद, गोपीनाथ मुंडेना ग्राम विकास मंत्रीपद, उमा भारती- जलसंपदा आणि गंगा स्वच्छता, नजमा हेपतुल्ला - अल्प संख्यांक कल्याण मंत्री, रामविलास पासवान - अन्न व नागरी पुरवठा मंत्री, व्यंकय्या नायडू- नागरी विकास मंत्री मनेका गांधी - महिला व बालकल्याण मंत्री, कलराज मिश्र - लघू व मध्यम उद्योग मंत्री, अशोक गजपती राजू - नागरी उड्डाण मंत्री, राधा मोहन सिंग- कृषी खातं, जुआल ओराम- आदिवासी कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य कल्याण मंत्री, स्मृती इराणी- मनुष्यबळ विकास मंत्री, सदानंद गौडा - रेल्वे मंत्री रवि शंकर प्रसाद - कायदे व दुरसंचार मंत्री, अनंत कुमार यांना - संसदीय कामकाज मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.