शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

४५ नेते सेक्स रॅकेटमध्ये; ब्लॅकमेल करून अर्चना झाली कोट्यवधीची मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 09:40 IST

सत्ताधारी खासदार व मंत्र्यांशी संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर पटनायक सरकार कोसळू शकते, असा दावा करण्यात आला आहे.

अंबिका प्रसाद कानुनगो, लोकमत न्यूज नेटवर्क

भुवनेश्वर : राजकारणी, व्यापारी व चित्रपट निर्माते यांसारख्या धनाढ्य व प्रभावशाली ४५ लोकांनी एकांतात घालवलेल्या क्षणांची छायाचित्रे, व्हिडीओ उघड करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याप्रकरणी पोलिसांनी २८ वर्षीय अर्चना नाग या तरुणीला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याने तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

पोलिसांनी आक्षेपार्ह व्हिडीओ असलेले पेन ड्राइव्ह आणि मोबाइल जप्त केले. यात अनेक चित्रपट निर्माते आणि राजकारण्यांचे व्हिडीओ असल्याचा संशय आहे. अर्चनाला गरिबीत आयुष्य जगायचे नव्हते. त्यामुळे तिने झटपट कमाईसाठी विलासी जीवनशैली जगण्यासाठी ‘अनैतिक’ मार्ग स्वीकारला.

अर्चनाचा राजेशाही थाट

अर्चनाकडे राजमहाल शोभावा असे आलिशान घर, परदेशातून आयात केलेल्या अंतर्गत गृहसजावटीच्या वस्तू, अनेक आलिशान कार, चार परदेशी कुत्रे आणि एक पांढरा घोडा आहे. आता तिच्या जीवनावर चित्रपट काढण्यात येणार आहे. 

अशी झाली सुरुवात...

अर्चनाचे २०१५ पूर्वीचे जीवन अतिशय हालाखीत गेले. तिची आई मिळेल ती कामे करून घराचा गाडा हाकत होती. अर्चना २०१५ मध्ये भुवनेश्वरला आली. प्रारंभी तिने एका सुरक्षा एजन्सीत काम केले आणि नंतर ब्यूटी पार्लरमध्ये काम करू लागली. २०१८ मध्ये तिने बालासोर जिल्ह्यातील जगबंधू चंद याच्याशी विवाह केला. याच ब्यूटी पार्लरमध्ये काम करताना ती सेक्स रॅकेट चालवत होती.

सरकार कोसळू शकते

अर्चनाचे सत्ताधारी खासदार व मंत्र्यांशी संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर पटनायक सरकार कोसळू शकते, असा दावा विरोधी पक्ष काँग्रेसचे आमदार एस. एस. सलुजा यांनी केला आहे. पोलिसांनी अद्याप कोणाचेही नाव उघड केलेले नाही.

राज्यात खळबळ

जगबंधू व अर्चनाची काही आमदार आणि प्रभावशाली लोकांसोबतची छायाचित्रे व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ माजली आहे. तिने २०१८ ते २०२२ या चार वर्षांच्या काळात ३० कोटींची संपत्ती जमा केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. 

नेमकी काय करायची?

अर्चना धनाढ्य आणि प्रभावशाली व्यक्तींशी मैत्री करायची. अर्चनाच्या सेक्स रॅकेटची माहिती असल्याने हे लोक तिच्याकडे मुलींची मागणी करत. ती मुली पुरवून त्यांचे ‘त्या’ क्षणांचे चित्रीकरण करायची. व्हिडीओ उघड करण्याची धमकी देत खंडणी उकळायची. 

टॅग्स :Odishaओदिशा