शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे, रश्मी मेटॅलिक्सच्या ४,००० कोटी प्रकरणी समिती करणार चाैकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 05:39 IST

काेलकाता उच्च न्यायालयाचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्ककोलकाता : न्यायाधिकरणाच्या कार्यवाहीमध्ये भारतीय रेल्वे आणि अधिकाऱ्यांनी रश्मी मेटॅलिक्स या पब्लिक लि. कंपनीशी संगनमत करून फसवेगिरी केल्याची धक्कादायक बाब कोलकाता उच्च न्यायालयाच्या निदर्शनास येताच न्यायालयाने अर्थ मंत्रालयाला याप्रकरणाची  चौकशी करण्यासाठी तातडीने विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश मंगळवारी दिले.

प्रथमदर्शनी न्यायाधिकरणासमोर रेल्वेचे वर्तन अयोग्य आणि अनियमित होते, असे निरीक्षण नोंदवित न्या. शेखर सराफ यांच्या एकलपीठाने दक्षिण पूर्व रेल्वे (एसईआर) आणि पब्लिक लि. कंपनी  रश्मी मेटॅलिक्स यांच्यामध्ये झालेल्या मध्यस्थ अवार्डवर बिनशर्त स्थगिती दिली. रेल्वेने रश्मी मेटॅलिक्स वर  ४००० कोटी पेक्षा अधिक किमतीच्या दाव्याचा बचाव करताना कोणताही साक्षीदार किंवा पुरावे सादर न करणे, ही बाब विवेकबुद्धीला पटणारी नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने यावेळी केली.

न्यायालय म्हणाले की, सरकारी कंपन्यांनी अधिक काळजीपूर्वक वागणे अपेक्षित आहे. कारण करदात्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे. मात्र, यावरून सत्यनिष्ठा, प्रामाणिकपणा या पवित्र तत्त्वांचा विसर पडत चालला आहे, असे वाटते. याप्रकरणी विशेष समितीमार्फत चौकशी करून तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. 

काय आहे प्रकरण? nमे २०२१  च्या न्यायाधिकरणाच्या निवाड्याशी संबंधित याचिका व ऑगस्ट २०२१ मध्ये या निवाड्यात केलेल्या दुरुस्त्यांसंबंधी प्रकरणे न्यायालय हाताळत होते, ज्याद्वारे न्यायाधिकरणाने दक्षिण पूर्व रेल्वेला रश्मी मेटॅलिकला अंदाजे १,३०१ कोटी रुपये देण्याचे आदेश दिले.nया निर्णयाला भारतीय रेल्वेने आव्हान देत न्यायाधिकरणाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली. तर रश्मी मेटॅलिकने आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली.nन्यायालयाला रेल्वे अधिकारी आणि कंपनीने हातमिळवणी केल्याचा संशय आला. रेल्वेने केस हारावी व हरलेली लढाई लढत असल्याचे नुसते सोंग करावे, हे सर्व परिस्थितीवरून स्पष्ट होते, असे न्यायालयाने म्हटले. न्यायाधिकरणाने आदेशात दुरुस्ती करण्यासाठी दिलेल्या स्पष्टीकरणावरही संशय व्यक्त केला.

तातडीने समिती नेमारेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या धक्कादायक वर्तनाची चौकशी करण्यासाठी न्यायालयाने अर्थ मंत्रालयाला सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली बहुसदस्यीय समिती तातडीने नेमण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे