शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीपासून 400 किमीवर 400 टनांचे स्पेस स्टेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 10:59 IST

इस्रोच्या प्राथमिक अंदाजानुसार  स्पेस स्टेशनचे एकूण वजन सुमारे ४०० टनांपर्यंत असू शकते. इस्रोने स्पेस स्टेशनसाठी तंत्रज्ञान विकसित करण्यास सुरुवात केली आहे. 

बंगळुरू : अंतराळात आणखी एक उंच झेप घेण्याची तयारी भारताने सुरू केली आहे. अंतराळातील भारताच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा एक भाग म्हणून, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने शक्य तितक्या लवकर देशातील पहिले अंतराळ स्थानक उभारण्याचे काम सुरू केले आहे. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ म्हणाले की, स्पेस स्टेशनचे पहिले मॉड्यूल येत्या काही वर्षांत लॉन्च केले जाऊ शकते.

अंतराळ स्थानक पृथ्वीच्या खालील कक्षेत स्थापित केले जाईल. त्यात ४ अंतराळवीर राहू शकतील. विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक डॉ. उन्नीकृष्णन नायर म्हणाले की, पृथ्वीपासून ४०० किलोमीटर उंचीच्या कक्षेत स्थापित होण्यासाठी देशातील सर्वात शक्तिशाली रॉकेट ‘बाहुबली’ किंवा लॉन्च व्हेईकल मार्क-३ वापरण्याची योजना आहे. स्पेस स्टेशनचे मुख्य मॉड्यूल लाइफ सपोर्ट आणि कंट्रोल सिस्टमने सुसज्ज असेल. हे ऑक्सिजन निर्माण करण्यास, कार्बन डायऑक्साइड काढून टाकण्यास  मदत करेल.

विशेष डॉकिंग पोर्ट तयार करणारस्पेस स्टेशनचे एक टोक हे क्रू मॉड्यूल आणि अंतराळवीरांना घेऊन जाणाऱ्या रॉकेटसाठी डॉकिंग पोर्ट असेल. इस्रो यासाठी एक विशेष डॉकिंग पोर्ट विकसित करत आहे. हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या डॉकिंग पोर्टसारखे असू शकते. स्पेस स्टेशनमध्ये चार स्वतंत्र मॉड्यूल्स आणि सौर पॅनेलच्या किमान चार जोड्या असू शकतात.

...तर भारत बनणार चौथा देश- २०३५ पर्यंत अंतराळ स्थानक उभारण्याची भारताची योजना आहे. यानंतर अमेरिका, रशिया आणि चीननंतर स्वतःचे अंतराळ स्थानक असणारा भारत चौथा देश बनेल. - भारतीय अंतराळ स्थानकाने केलेल्या छायाचित्रानुसार पहिल्या टप्प्यात दोन मोठे सौर पॅनेल असतील, जे स्पेस स्टेशन चालविण्यासाठी वीज निर्माण करतील. 

टॅग्स :isroइस्रो