शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

लिपीक पदासाठी ४० प्रश्न सोपे जि.प.ची पदभरती :प्रशासनाचा दुसरा पेपरही गेला चांगला!

By admin | Updated: November 28, 2015 23:55 IST

जळगाव- जिल्हा परिषदेच्या भरतीसंबंधी दुसर्‍या टप्प्यात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), पशुधन पर्यवेक्षक आणि लिपीक या जागांसाठी शनिवारी शहरात १० केंद्रांवर परीक्षा झाली. त्यात लिपीक पदासाठी १०० गुणांच्या लेखी परीक्षेत ४० प्रश्न सोपे, पण ६० प्रश्न अवघड होते. अर्थातच उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांचा चांगलाच कस लागेल हे स्पष्ट झाले आहे.

जळगाव- जिल्हा परिषदेच्या भरतीसंबंधी दुसर्‍या टप्प्यात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), पशुधन पर्यवेक्षक आणि लिपीक या जागांसाठी शनिवारी शहरात १० केंद्रांवर परीक्षा झाली. त्यात लिपीक पदासाठी १०० गुणांच्या लेखी परीक्षेत ४० प्रश्न सोपे, पण ६० प्रश्न अवघड होते. अर्थातच उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांचा चांगलाच कस लागेल हे स्पष्ट झाले आहे.
अनेक महिलांनी ही परीक्षा दिली. त्यांचे चिमुकलेही आल्याचे दिसले. त्यांचा सांभाळ करण्यासाठी पतिराज, आईवडील आले होते. केंद्रानजीक परीक्षार्थींचे नातेवाईक एकत्र आल्याचे दिसून आले. त्यांना आपल्या पाल्याच्या परीक्षेबाबतची काळजी पदोपदी होती, असे पाहणीदरम्यान जाणवले.
जि.प.तर्फे २५ रोजी आरोग्यसेवक, कृषि अधिकारी, कृषि विस्तार अधिकारी या पदांसाठी परीक्षा झाली. मागील आणि शनिवारची परीक्षा शांततेत पार पडली. अर्थातच नियोजन आणि परीक्षेदरम्यानची चोख जबाबदारी यामुळे प्रशासनाला दोन टप्प्यांमध्ये परीक्षेचे काम व्यवस्थितपणे पार पाडता आले.
कनिष्ठ अभियंंता पदाच्या तीन जागांसाठी ३५५ उमेदवारांनी तर पशुधन पर्यवेक्षपदाच्या दोन जागांसाठी ५७ उमेदवारांनी परीक्षा दिली. सकाळी १० ते ११.३० या दरम्यान शहरात विद्यानिकेतन विद्यालय, ला.ना. आणि नंदिनीबाई विद्यालयात ही परीक्षा झाली.
तर कनिष्ठ लिपीकांच्या सात जागांसाठी १५६३ उमेदवारांनी परीक्षा दिली. ३३३ उमेदवार गैरहजर राहीले. कोल्हे, लुंकड, अँग्लो उर्दू, खुबचंद सागरमल, राऊत आदी विद्यालयांमधील केंद्रांवर ही परीक्षा झाली, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी यांनी दिली.