शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

४० किमी जंगल तुडवत मुलीला नेले रुग्णालयात; पुरामुळे वाढल्या लोकांच्या अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 11:57 IST

हिमाचल प्रदेशात आजारी मुलीला उपचारार्थ रुग्णालयात नेण्यासाठी कुटुंबीयांनी खुर्चीत बसवून ४० किलोमीटर दूर नेले.

बलवंत तक्षक ,लोकमत न्यूज नेटवर्क

चंडीगड : हिमाचल प्रदेशात आजारी मुलीला उपचारार्थ रुग्णालयात नेण्यासाठी कुटुंबीयांनी खुर्चीत बसवून ४० किलोमीटर दूर नेले.  कुल्लू जिल्ह्यातील सैंज खोऱ्यातील गाडापारलीमध्ये झालेल्या जोरदार पावसानंतर लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. रुग्णांना खुर्चीत बसवून हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागत आहे. गाडापारली गावापासून आठ किमी अंतरावर हा रस्ता आहे.

मात्र, पाऊस आणि भूस्खलनाने रस्ते वाहून गेले आहेत. मेल गावातील सरला या तरुणीचे पोट अचानक दुखू लागले. तिच्या कुटुंबीयांनी नातेवाइकांच्या मदतीने तिला खुर्चीवर बसवून ४० किलोमीटरचा प्रवास जंगल आणि कच्चा रस्ता तुडवत पार केला. 

निहारणी गावात पोहोचल्यानंतर त्यांना रस्ता सापडला आणि रुग्णाला उपचारासाठी कुल्लू येथे दाखल करण्यात आले. या भागात अगोदरच मूलभूत सुविधा नाहीत, आता पुरामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या चार दिवसांत रुग्णांना खुर्च्यांवर बसवून कुल्लूला नेण्याची ही तिसरी वेळ आहे.