शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरात चकमकीत ४ दहशतवादी ठार;  मृतांमधील एक जण पाकिस्तानी नागरिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 01:18 IST

रायफली, पिस्तूल, दारूगोळा जप्त

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी पहाटे कुलगाम व पुलवामा येथे सुरक्षा दलाबरोबर झालेल्या दोन स्वतंत्र चकमकीत चार दहशतवादी ठार झाले आहेत. मृतांमध्ये एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा समावेश आहे.

कुलगाम जिल्ह्यातील चिंगाम गावात दहशतवादी लपलेले आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी या परिसराची नाकेबंदी केली. त्यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. तारीक अहमद मीर, समीरभाई उर्फ उस्मान अशी त्यांची नावे असून ते जैश-ए-मोहम्मद या संघटनेचे दहशतवादी आहे. त्यातील समीरभाई हा पाकिस्तानी दहशतवादी आहे. त्यांच्याकडून एम फोर रायफल व पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. पुलवामा जिल्ह्यातील दादोरा भागात शनिवारी पहाटे झालेल्या एका चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडून दोन एके रायफली जप्त करण्यात आल्या आहेत.

काश्मीरमधील केरन क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून दोन ते तीन माणसे भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होती. सुरक्षा दलाने त्यांचा डाव हाणून पाडला. ही माणसे हातातले सामान टाकून पळून गेली. त्या सामानात असलेला चार रायफलींसह मोठा शस्त्रसाठा सुरक्षा दलाने जप्त केला आहे. शस्त्रांची तस्करी करण्याचा हा प्रकार होता.पाकिस्तानचा भारतीय वस्त्यांवर माराजम्मू-काश्मीरमधील दोन क्षेत्रामध्ये शनिवारी पहाटे पाकिस्तानी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय वस्त्यांवर तोफगोळ्यांचा जोरदार मारा केला. त्याला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानच्या माऱ्यात पूंछ क्षेत्रातील हमीदाबी नावाची एक महिला जखमी झाली आहे.पूंछ जिल्ह्यातील मकोटे भागात सीमेजवळ असलेल्या भारतीय वस्त्यांवर पाकिस्तानच्या लष्कराने मारा केला. कठुआ जिल्ह्यातील हिरानगर येथे आंतरराष्ट्रीय सीमेवरही पाकिस्तानी सैन्याने नागरी वस्त्यांवर तोफगोळ्यांचा मारा केला. सुदैवाने त्यामध्ये मोठी हानी झालेली नाही. पाकिस्तानने हा मारा शनिवारी पहाटे साडेचार वाजता बंद केला.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानterroristदहशतवादी