शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 06:47 IST

- सुरेश एस. डुग्गर लोकमत न्यूज नेटवर्क कुलगाम (जम्मू आणि काश्मीर) : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यामध्ये मंगळवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ...

- सुरेश एस. डुग्गरलोकमत न्यूज नेटवर्ककुलगाम (जम्मू आणि काश्मीर) : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यामध्ये मंगळवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. या चारमध्ये बासित दारचाही समावेश आहे, जो लश्कर-समर्थित दहशतवादी संघटना रेझिस्टन्स फ्रंटचा टॉप कमांडर होता. त्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस होते. १८ हून अधिक हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता.

या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर, सुरक्षा दलांनी सोमवारी रात्री कुलगामच्या रेडवानी भागात शोधमोहीम सुरू केली होती. मंगळवारी सकाळी चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवादी मारले. तसेच दहशतवादी लपून बसलेल्या घरात स्फोट घडवून आणले. यामुळे घराला आग लागली. 

कशी झाली चकमक?चकमकीच्या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना, काश्मीरचे पोलिस महासंचालक व्ही.के. विर्दी म्हणाले की, पोलिसांना सोमवारी रात्री दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली होती. पोलिसांनी इतर सुरक्षा दलांसह परिसराला घेराव घातला. मंगळवारी सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार चकमक झाली जी दुपारपर्यंत सुरू होती. चकमकीत बासित दार याच्यासह चार दहशतवादी ठार झाले, असे त्यांनी सांगितले. 

बासित जहाल दहशतवादीnबासित ‘अ’ श्रेणीचा दहशतवादी होता. तो २०२१ पासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होता. श्रीनगर आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि अल्पसंख्याक सदस्यांवरील हल्ल्यांसह १८ हून अधिक प्रकरणांमध्ये सहभाग होता. nफहीम अहमद असे ठार झालेल्या दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव आहे. तो अतिरेक्यांना मदत करणारा ग्राउंड वर्कर होता. मात्र, फहीमबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

 

 

टॅग्स :terroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवान